AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG ग्राहकांसाठी अच्छे दिन; 12 सिलेंडरवर 300 रुपयांची मिळणार सबसिडी

केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांत सर्वसामान्य ग्राहक आणि उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सध्या घरगुती गॅस सिलेंडर 900 रुपयांच्या आता मिळत आहे. तर उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तर अजून स्वस्तात पडत आहे. आता 12 सिलेंडरवर 300 रुपयांची सबसिडी पुढील वर्षांपर्यंत सुरु राहणार आहे.

LPG ग्राहकांसाठी अच्छे दिन; 12 सिलेंडरवर 300 रुपयांची मिळणार सबसिडी
देशातील 9 कोटींहून अधिक कुटुंबांसाठी आनंदवार्ता
| Updated on: Apr 13, 2024 | 5:56 PM
Share

सरकारी कंपन्यांनी गेल्या सात महिन्यांपासून घरगुती गॅसच्या किंमतीत दरवाढ केली नाही. 14.2 किलोग्रॅम घरगुती गॅसच्या किंमतीत सध्या वाढ करण्यात आलेली नाही. उलट त्यात 300 रुपयांची कपात करण्यात आली आहे. मार्च महिन्यातील 100 रुपयांच्या कपातीनंतर गॅस सिलेंडरचा भाव आता 802.50 रुपयांवर आला आहे. चालू आर्थिक वर्षात म्हणजे एप्रिल 2024 ते मार्च 2025 पर्यंत कोट्यवधी जनतेला एलपीजी सिलेंडरवर सबसिडी मिळेल. ही सबसिडी 300 रुपये असेल. वर्षभरातील केवळ 12 सिलेंडरवरच सबसिडीचा लाभ मिळेल. सबसिडीचा लाभ घेण्यासाठी अर्थातच तुम्ही उज्ज्वला योजनेशी जोडलेले असणे अनिवार्य आहे. केंद्र सरकारच्या दाव्यानुसार, उज्ज्वला योजनेचे देशात 9 कोटींहून अधिक लाभार्थी आहेत.

काय झाला फायदा

गेल्या मार्च महिन्यात, केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेतंर्गत गरीब महिलांना 300 रुपये प्रति सिलेंडरची सबसिडी जाहीर केली होती. ही सबसिडी मार्च 2024 पर्यंत लागू होती. आता ही सबसिडी 31 मार्च 2025 रोजीपर्यंत वाढविण्यात आली आहे. सबसिडीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

केव्हापासून मिळते सबसिडी

केंद्र सरकारने इंधनाचे भाव वाढल्यानंतर मे 2022 मध्ये उज्ज्वला योजनाच्या लाभार्थ्यांना 200 रुपये प्रति सिलेंडर सबसिडी सुरु केली. ऑक्टोबर 2023 मध्ये सबसिडी 300 रुपयांची करण्यात आली. ही सबसिडी प्रति वर्ष 12 एलपीजी सिलेंडर मिळते. आता ती पुढील वर्षी मार्च महिन्यापर्यंत सुरु राहणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातील जवळपास 10 कोटी कुटुंबांना लाभ होण्याची आशा आहे. त्यासाठी 12,000 कोटी रुपयांचा खर्च येण्याची शक्यता आहे.

सात महिन्यांपासून दरवाढीला ब्रेक 

सरकारी कंपन्यांनी गेल्या सात महिन्यांपासून घरगुती गॅसच्या किंमतीत दरवाढ केली नाही. 14.2 किलोग्रॅम घरगुती गॅसच्या किंमतीत सध्या वाढ करण्यात आलेली नाही. उलट त्यात 300 रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे किंमती 900 रुपयांच्या आत आल्या आहेत. तर काही महिन्यात किंमती स्थिर आहेत. या बदलामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता हा बदल निवडणुकीपूरताच आहे की नंतर पण ही कपात कायम राहिल, हे लवकरच, लोकसभा निवडणुकीनंतर समोर येईल.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.