AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साखर, डाळ, अंडी… आता चिकनचे दरही भडकणार? श्रावण संपताच…

Chicken Price Hike : गेल्या वर्षभरात अंड्यांच्या किमतीत तब्बल 35 ते 40 टक्क्यांची वाढ झाली आहे. आता चिकनच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

साखर, डाळ, अंडी... आता चिकनचे दरही भडकणार? श्रावण संपताच...
Chicken Price HikeImage Credit source: Google
| Updated on: Aug 26, 2026 | 5:15 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून महागाईमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. साखर, डाळ, अंडी, कांदा या रोजच्या स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या अन्न पदार्थांचे दरही वाढले आहेत. साखरेचे दर 80 रुपयांपर्यंत वाढल्याने अनेक दुकानदारांनी चहाचे दरही वाढवले आहेत. त्याचबरोबर अंड्यांच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत असून, अनेक ठिकाणी किरकोळ बाजारात एका अंड्याची किंमत जवळपास 9 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या वर्षभरात अंड्यांच्या किमतीत तब्बल 35 ते 40 टक्क्यांची वाढ झाली आहे. आता अंडे इतके महाग झाले असेल, तर आगामी काळात चिकनच्या किमतीही वाढणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अंडी महागण्यामागचं कारण काय?

अंड्यांच्या किमती वाढण्यामागे कोंबड्यांच्या खाद्याच्या वाढत्या किमती हे प्रमुख कारण आहे. कोंबड्यांच्या खाद्यामध्ये मोठ्या प्रमाणात मक्याचा वापर केला जातो. त्याचवेळी देशात इथेनॉल निर्मितीसाठीही मक्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे पोल्ट्री उद्योगासाठी मका महाग झाला आहे. कोंबडीपालनाच्या एकूण खर्चामध्ये मक्याचा वाटा सुमारे 65 ते 70 टक्के असतो. त्यामुळे मक्याच्या किमती वाढल्याचा थेट परिणाम अंडी आणि चिकनच्या दरांवर होतो.

उष्णतेमुळेही अडचण वाढली

केवळ मक्याच्या वाढलेल्या किमती हेच अंडे महागण्याचे कारण नाही. यंदाच्या तीव्र उन्हामुळे आणि बदलत्या हवामानामुळेही अंड्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. अधिक तापमानात कोंबड्यांची अंडी देण्याची क्षमता कमी होते. काही ठिकाणी उष्णतेमुळे कोंबड्यांचा मृत्यूही होतो. त्यामुळे बाजारात अंड्यांचा पुरवठा कमी होतो आणि परिणामी किमतींवर दबाव वाढतो.

श्रावणानंतर चिकन महागणार?

रोजच्या आहारातील पदार्थांची किंमत महागली असल्यामुळे आता चिकनच्या किमती वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कारण मका आणि सोयाबीनसारख्या खाद्यधान्यांच्या किमती वाढल्याने कोंबडीपालनाचा खर्चही वाढत आहे. खाद्याच्या महागाईचा परिणाम अंड्यांसोबतच चिकनच्या किमतीवरही होऊ शकतो. चिकनच्या किमती किती वाढतील की नाही हे प्रामुख्याने मागणी, पुरवठा, उत्पादन आणि स्थानिक बाजारातील परिस्थितीवर अवलंबून असेल. त्यामुळे श्रावण संपल्यानंतर अंड्यांसोबतच चिकनच्या दरांमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे.

Follow Us
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग...
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग... सुषमा अंधारे संतापल्या
थरकाप उडवणारे दृश्य! पूराच्या हाहाकारात 132 भारतीय पर्यंटकांचा मृत्यू
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये पुराचा हाहाकार; 132 भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी अंत
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार-डी.के. शिवकुमार
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार; कारण...
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर, नेत्यांना दिलं सर्वात मोठं आश्वासन
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी आयुक्तांना धारेवर धरलं
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी अमरावतीतील प्रकरणानंतर आयुक्तांनाच धारेवर धरलं
एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी 6 आरोपींना अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक
अमरावती रुग्णालय आग प्रकरण; चौकशी प्रमुखांवर सुषमा अंधारेंचा संताप
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आग प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी संजय काटकरांना खडसावले
लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली...
लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली...
"बॅनर A-1, पण रस्ता स्पेस टेक्नॉलॉजीचा"; ठाकरेंचा भरत गोगावलेंन टोला
आदित्य ठाकरेंचा सवाल: