Penalty : या दोन ब्रँड्सला जोरदार दणका..ठोठावला तब्बल 392 कोटींचा दंड

Penalty : भारतातील या दोन ब्रँड्सला व्यवसायातील चुकीचा फटका बसला आहे.

Penalty : या दोन ब्रँड्सला जोरदार दणका..ठोठावला तब्बल 392 कोटींचा दंड
PenaltyImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 19, 2022 | 10:27 PM

नवी दिल्ली : देशातील ऑनलाइन ट्रॅव्हल आणि हॉस्पिटॅलिटी (Travels And Hospitality) क्षेत्रातील बड्या कंपन्यांवर स्पर्धेचे नियम तोडल्याबद्दल कारवाईचा बडगा उगारण्यात आला. स्पर्धा आयोगाने (Competition Commission) बाजारातील आपल्या स्थानाचा चुकीचा फायदा उचलल्याबद्दल या ब्रँड्सला (Brands) धडा शिकविला आहे.

स्पर्धा आयोगाने आज MakeMyTrip- Goibibo ( MMT-Go) आणि ओयो (OYO) या दोन कंपन्यांना 392 कोटींचा दंड ठोठावला आहे. या दोन्ही कंपन्यांनी बाजारातील त्यांच्या स्थितीचा चुकीचा फायदा उचलल्याचा दावा करण्यात आला आहे.

या दोन कंपनीच्या या अप्पलपोटेपणामुळे इतर कंपन्या आणि प्रतिस्पर्ध्यांना बाजारात मोठे नुकसान झाले आहे. ही बाब समोरच आली नाही तर सिद्ध झाल्याने स्पर्धा आयोगाने हा दंड ठोठावला आहे.

हे सुद्धा वाचा

CCI च्या निर्णयानुसार, MMT-Go आणि OYO या दोन कंपन्यांना त्यांच्या व्यवसायाच्या 5% दरांनी 223.48 कोटी रुपये आणि 168.88 कोटी रुपयांचा दंड लावला आहे. केवळ दंडाच्या कारवाईवरच आयोग थांबले नाही.

CCI ने निर्देश दिले आहे की, या दोन्ही ब्रँड्सने हॉटेल आणि चेन हॉटेलच्या त्यांच्या नियमात बदल करावा. त्यामुळे या क्षेत्रातील इतर कंपन्यांनाही काम करता येईल आणि सेवेचा लाभ देता येईल.

हे दोन्ही ब्रँड प्रतिस्पर्ध्यांना आणि इतर ब्रँड्सला व्यवसाय करण्यासाठी कसलीही मुभा देत नव्हती. त्यांना रेटमध्ये सवलती अथवा इतर बाबींमध्ये सहभागी करुन घेत नव्हती. त्यांनी एकप्रकारे एकाधिरशाही आणण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले होते.

स्पर्धा आयोगाने हे स्पष्ट केले आहे की, MMT-Go त्यांच्या अटी आणि शर्तींबद्दल करेल, जेणेकरुन इतर ट्रॅव्हल्स एजन्सींजना सदर हॉटेल्स आणि चेन हॉटेल्समध्ये व्यवसाय करणे सोपे होईल.

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.