AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DMart Q1 result: राधाकिशन दमानींच्या कंपनीला मोठा फायदा; 132 टक्के प्रॉफिट

D Mart | कंपनीकडून शनिवारी तिमाही निकाल जाहीर करण्यात आले. गेल्यावर्षी एप्रिल-जून तिमाहीत कंपनीने 3,833.23 कोटी रुपये कमावले होते. मात्र, यंदा हा आकडा 5,031.75 कोटींवर जाऊन पोहोचला आहे.

DMart Q1 result: राधाकिशन दमानींच्या कंपनीला मोठा फायदा; 132 टक्के प्रॉफिट
डी मार्ट
| Edited By: | Updated on: Jul 11, 2021 | 7:54 AM
Share

मुंबई: प्रसिद्ध उद्योजक राधाकिशन दमानी यांच्या एव्हेन्यू सुपरमार्टस लिमिटेड समूहातील DMart कंपनीला मोठा फायदा झाला आहे. जून तिमाहीत कंपनीच्या नफ्याचा आकडा कित्येकपटींनी वाढला आहे. या तिमाहीत कंपनीला 115.13 कोटींची निव्वळ नफा झाला आहे. गेल्यावर्षी डी मार्टला 50 कोटींचा निव्वळ नफा झाला होता. याचा अर्थ यंदा कंपनीच्या नफ्यात 132 टक्क्यांची वाढ झाली आहे. (D Mart Q1 results company net profit jump of 132 and revenue also increased)

कंपनीकडून शनिवारी तिमाही निकाल जाहीर करण्यात आले. गेल्यावर्षी एप्रिल-जून तिमाहीत कंपनीने 3,833.23 कोटी रुपये कमावले होते. मात्र, यंदा हा आकडा 5,031.75 कोटींवर जाऊन पोहोचला आहे.

या आठवड्यात शेअर बाजारातही एव्हेन्यू सुपरमार्टसच्या समभागाचा भाव 1.96 टक्क्यांनी वाढून 3,425 रुपयांवर पोहोचली. या समभागाच्या किंमतीने सध्या सार्वकालिक उच्चांक गाठला आहे. एव्हेन्यू सुपरमार्टसचे एकूण भांडवली मूल्य 2.18 लाख कोटी असून ही देशातील 18 वी मोठी कंपनी आहे.

‘ही’ कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना देणार 1-1 लाखांचा बंपर बोनस

कोरोनामुळे अर्थव्यवस्था आणि जनता दोघेही उद्ध्वस्त झालेत. संकटाच्या या काळात बऱ्याच कंपन्या आपल्या कर्मचार्‍यांच्या बचावासाठी पुढे आल्यात. कर्मचार्‍यांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्यात, जेणेकरून त्यांना मदत करता यावी. यासंदर्भात ग्लोबल टेक दिग्गज मायक्रोसॉफ्टने आपल्या कर्मचार्‍यांना मोठा बोनस जाहीर केलाय. द वर्जच्या अहवालानुसार, मायक्रोसॉफ्टने आपल्या कर्मचार्‍यांना 1500-1500 डॉलर म्हणजेच एक लाखाहून अधिक रुपयांचा स्वतंत्र बोनस देण्याचा निर्णय घेतलाय. मायक्रोसॉफ्टच्या मुख्य पीपल्स ऑफिसरने (CPO) 8 जुलै रोजी हा बोनस जाहीर केला. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात बोनस दिला जाणार आहे. मायक्रोसॉफ्टमध्ये काम करणाऱ्या जगातील प्रत्येक कर्मचाऱ्याला याचा फायदा होईल.

संबंधित बातम्या:

रतन टाटांची कंपनी टीसीएस 40 हजार फ्रेशर्स घेणार

Corona Crisisमध्ये ही कंपनी आपल्या कर्मचार्‍यांना देणार 1-1 लाखांचा बंपर बोनस

Post Officeच्या ‘या’ योजनेतील गुंतवणुकीत 5 वर्षांत 14 लाख मिळणार; जाणून घ्या दरमहा किती पैसे गुंतवाल?

(D Mart Q1 results company net profit jump of 132 and revenue also increased)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.