स्वातंत्र्यदिनानिमित्त खास ऑफर; तीन वर्षांच्या फिक्स्ड डिपॉझिटवर ‘या’ बँकेत 7 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज

Fixed Deposit| डीसीबी बँक ही देशातील प्रमुख खासगी बँकांपैकी एक आहे. देशभरात या बँकेच्या 354 शाखा आहेत. सध्याच्या घडीला बँकेत 10 लाखांच्या आसपास ग्राहक आहेत.

स्वातंत्र्यदिनानिमित्त खास ऑफर; तीन वर्षांच्या फिक्स्ड डिपॉझिटवर 'या' बँकेत 7 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज
डीसीबी बँक व्याजदर

मुंबई: सध्या बँकेतील बचत खात्यांवरील व्याजदर निचांकी पातळीला पोहोचला आहे. त्यामुळे ग्राहक सातत्याने जास्त व्याजदर असणाऱ्या बँकांच्या शोधात असतात. अशा ग्राहकांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. कारण, डीसीबी बँकेने 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर एका विशेष मुदत ठेव योजनेची घोषणा केली होती. या मुदत ठेव योजनेत तीन वर्षांसाठी पैसे गुंतवल्यास 7.11 टक्के इतका व्याजदर मिळत आहे. या ऑफरचा आजचा शेवटचा दिवस आहे. तुम्हाला या योजनेत पैसे गुंतवायचे असतील तर DCB बँकेचे संकेतस्थळ किंवा मोबाईल अॅप्लिकेशनचा वापर करता येईल.

डीसीबी बँक ही देशातील प्रमुख खासगी बँकांपैकी एक आहे. देशभरात या बँकेच्या 354 शाखा आहेत. सध्याच्या घडीला बँकेत 10 लाखांच्या आसपास ग्राहक आहेत. रिटेल, मायक्रो फायनान्स, सूक्ष्म व लघू उद्योग, मिड कॉर्पोरेट मायक्रोफायनान्स इन्स्टिट्युशन, कृषी, कमोडिटी अशा विविध क्षेत्रांमध्ये बँकेने व्यावसायिक स्तरावर पाय रोवले आहेत.

डीसीबी बँकेच्या व्याजदरात बदल

डीसीबी बँकेने मे महिन्यात मुदत ठेवीवरील व्याजदरात बदल केला होता. बँकेत सात दिवसांपासून ते दहा वर्षांसाठीच्या कालावधीच्या मुदत ठेव योजना आहेत. यापैकी 7 ते 14 दिवसांच्या मुदत ठेवीवर 4.55 टक्के व्याज मिळते. 91 दिवस ते सहा महिन्यांसाठी 5.25 टक्के व्याज मिळते. तर 6 महिन्यांपासून ते 12 महिन्यांच्या कालावधीच्या मुदत ठेव योजनांसाठी 5.70 टक्के इतका व्याजदर आहे.

बचत खात्यावर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँका कोणत्या?

आरबीएल बँकेतील बचत खात्यावर व्याजदर

सर्व व्यावसायिक बँकांच्या तुलनेत आरबीएल बँक बचत खात्यावर सर्वाधिक व्याज दर देते. आरबीएलच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, RBL ही खासगी क्षेत्रातील बँक बचत खात्यावर 4.5 टक्के ते 6.25 टक्के व्याज देते.

या बँकेत 1 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर 4.5 टक्के व्याज मिळतो. तर 1 लाख ते 10 रुपयांच्या ठेवींवर हा व्याजदर 6 टक्के आहे. त्याशिवाय आरबीएल बँकेत 10 लाख रुपयांपेक्षा जास्त ठेवींवर 6.25 टक्के दराने व्याज मिळतो.

बंधन बँकेतील बचत खात्यावर व्याजदर

बंधन बँक ही ग्राहकांच्या बचत खात्यावर 3 टक्के ते 6 टक्के व्याज देते. मात्र हा व्याज तुमच्या बँक खात्यात किती रक्कम शिल्लक आहे, यावर अवलंबून असते. या बँकेच्या अधिकृत वेबसाईटनुसार ही बँक 1 लाखांपर्यंतच्या ठेवींवर 3 टक्के व्याज देते.

तर 1 लाख रुपये ते 10 लाख रुपयांच्या ठेवींवर 4 टक्के व्याज दिला जातो. तर 10 लाखांहून अधिक ठेवींवर 6 टक्के दराने व्याज दिला जातो.

येस बँक बचत खात्यावर व्याजदर

येस बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, खासगी क्षेत्रातील Yes बँक बचत खात्यावर आपल्या ग्राहकांना 4 किंवा 5.5 टक्के दराने व्याज देत आहे. ही खासगी क्षेत्रातील बँक 1 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर 4 टक्के दराने व्याज देते.

जर तुम्ही या बँकेत 1 ते 10 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला दरवर्षाला 4.75 टक्के दराने व्याज मिळेल. तर दररोज 1 लाख ते 100 कोटी रुपयांच्या ठेवीवर 5.5 टक्के व्याज मिळतो. दरम्यान कोणत्याही बँकेत बचत खाते उघडण्यापूर्वी त्या बँकेचा व्याजदर नक्की तपासा. त्यासोबतच इतरही सेवांची माहिती घेऊनच गुंतवणूक करा.

संबंधित बातम्या: 

‘या’ बँकांमध्ये बचत खात्यावर मिळतेय सर्वाधिक व्याज

ग्रामीण भागात कमाईची सुवर्णसंधी; ‘या’ सरकारी योजनेचा लाभ घेऊन कमवा पैसे

सर्वाधिक व्याज देणाऱ्या पाच टॉप RD स्कीम; 50 रुपयांमध्ये खाते उघडा, 8 टक्के व्याज मिळवा

Published On - 6:38 am, Sun, 15 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI