AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dollar Vs Rupees : डॉलरची पुन्हा चढाई! दिल्लीपासून इस्लामाबादपर्यंत रुपयात घसरण

Dollar Vs Rupees : भारत असो वा पाकिस्तान डॉलरने दोन्ही देशांच्या रुपयांना सध्या धोबीपछाड दिली आहे. डॉलरच्या तुलनेत मोठी घसरण दिसून येत आहे. यावर्षी 20 टक्क्यांहून अधिकची घसरण दिसत आहे.

Dollar Vs Rupees : डॉलरची पुन्हा चढाई! दिल्लीपासून इस्लामाबादपर्यंत रुपयात घसरण
| Updated on: Aug 22, 2023 | 5:26 PM
Share

नवी दिल्ली | 22 ऑगस्ट 2023 : नवी दिल्लीपासून ते इस्लामाबादपर्यंत डॉलरने रुपयाला (Rupees Crash Against Dollar) धोबीपछाड दिली आहे. काही दिवसांपासून भारतीय रुपयाने घसरणीत रेकॉर्ड केला आहे. डॉलरच्या विरोधात रुपया मैदानात उतरला असला तरी लढाईपूर्वीच तो गर्भगळीत होत आहे. गेल्या काही वर्षांपासून डॉलरचा रुबाब सातत्याने वाढला आहे. त्या तुलनेत रुपयाला मोठी कामगिरी बजावता आलेली नाही. यावेळी तर रुपया डॉलरच्या तुलनेत विक्रमी 83.10 निच्चांकावर बंद झाला. पाकिस्तानच्या रुपयाची परिस्थिती तर यापेक्षा वाईट आहे. पाकिस्तानी रुपयाला तर डॉलरने लोळावले आहे. 103 दिवसांच्या आतच पाकिस्तानी रुपयात पण मोठी घसरण झाली आहे. मुल्याचा विचार करता, भारतीय रुपया, पाकिस्तानच्या रुपयापेक्षा अधिक सरस आहे.

डॉलर तेजीत

सध्या जागतिक बाजारात डॉलरचा रुबाब दिसून येत आहे. महागाई कमी करण्यासाठी केलेल्या उपाय योजना आणि गंगाजळीत झालेली वाढ यामुळे अमेरिकन डॉलरने मोठी झेप घेतली आहे. इतर देशांच्या चलनाचे मुल्य या घडामोडींमुळे कमी होत आहे. त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम दिसत आहे. भारतीय अर्थव्यवस्था आर्थिक मंदीच्या गर्तेत अडकलेली नाही. इतर देशांची अर्थव्यवस्था मात्र गंटागळ्या खात आहे. त्यात डॉलर अधिक मजबुतीने समोर येत असल्याने अनेक अर्थव्यवस्था अडचणीत येण्याची भीती आहे.

पाकिस्तानचे अवसान गळाले

मंगळवारी इंटर बँक मार्केटमध्ये पाकिस्तानी रुपया डॉलरच्या तुलनेत जबरदस्त आपटला आहे. सध्या एक डॉलर खरेदीसाठी 299 पाकिस्तानी रुपये लागतात. तर एक डॉलरसाठी जवळपास 84 रुपये भारतीय रुपया लागतो. यावरुन भारतीय रुपया दक्षिण आशियात मजबूत असल्याचे चित्र आहे. पण जागतिक पातळीवर भारतीय रुपयाचे मोठे अवमूल्यन झाले आहे.

घसरणीचे सत्र थांबेना

पाकिस्तानी रुपया डॉलरच्या तुलनेत 0.6 टक्क्यांनी घसरला आहे. पाकिस्तानमध्ये अगोदरच महागाईने कळस गाठला आहे. जनता महागाईने हैराण आहे. सध्या पाकिस्तानमध्ये काळजीवाहू सरकार कारभार पाहत आहे. पाकिस्तानी रुपया 11 मे 2023 रोजी 298.93 इतक्या निच्चांकावर होता. तज्ज्ञांच्या मते ही घसरण कायम राहील आणि एक डॉलरसाठी पाकिस्तानचे 300 रुपये मोजावे लागतील.

भारतीय रुपयावर संकट

भारतीय रुपयाला जागतिक बाजारात मान्यता मिळविण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. डॉलरला पर्याय देण्यासाठी चीन, भारतीय चलनात सध्या स्पर्धा सुरु आहे. पण रुपयाच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मोठे अवमूल्यन सुरु आहे. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया 83 पेक्षा पण खाली पोहचला आहे. या वर्षात भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत 0.24 टक्के घसरला. सध्याच्या आर्थिक वर्षात तो एक टक्क्यांनी घसरला.

चीनची दुरदृष्टी

रशियाचं रुबल, भारतीय रुपयासोबतच चीन डॉलरला आव्हान देत आहे. चीनने वन बेल्ट वन रुट च्या माध्यमातून त्याची जग जिंकण्याची महत्वकांक्षा अगदोरच अधोरेखित केली आहे. आता डिजिटल युआनच्या माध्यमातून चीन अधिक्रमण करत आहे. सध्या चीन जगातील 130 देशांशी व्यापार आणि व्यवसाय करत आहे. तो केवळ युआन या चलनातच होतात. यावरुन चीनने काळाच्या किती पूर्वी पाऊल टाकलं हे लक्षात येते.

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.