AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेतून प्रत्येक वर्षी 74 हजार मिळणार, कसं काय ते समजून घ्या

तुमचं मासिक उत्पन्न चांगलं असेल आणि तुम्हाला कोणतीही जोखिम न घेता गुंतवणूक करायची असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. तुम्हाला पोस्टाच्या मासिक उत्पन्न योजनेबाबत माहिती आहे का? नसेल तर ही बातमी वाचा तुम्हाला योग्य माहिती मिळेल.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेतून प्रत्येक वर्षी 74 हजार मिळणार, कसं काय ते समजून घ्या
पोस्ट ऑफिसच्या या योजनेतून प्रत्येक वर्षी 74 हजार मिळणार, कसं काय ते समजून घ्या
| Updated on: Aug 07, 2025 | 6:07 PM
Share

पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक आजच्या घडीला सुरक्षित मानली जाते. या माध्यमातून गुंतवणूक केलेल्या रकमेवर योग्य त्या व्याजदरात हमखास परतावा मिळतो. तुम्हाला महिन्याकाठी एखादी रक्कम हवी असल्यास पोस्ट ऑफिसची मंथली इनकम स्कीम ही एक चांगली योजना आहे. या योजनेत एकदा पैसे भरले की महिन्याला तुम्हाला निश्चित व्याज सुरु होतो. यामुळे तुम्हाला महिन्याकाठी एक निश्चित ठराविक रक्कम व्याजाच्या स्वरूपात हाती पडते. ही योजना विशेषतः ज्यांना नियमित मासिक उत्पन्नाची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी फायदेशीर आहे.यात योजनेत कोणतीही जोखिम नाही. तुम्ही या योजनेत गुंतवणूक करून वर्षाला 74 हजार रुपयांची कमाई करू शकता. कसं काय ते समजून घ्या.

या योजनेत किती रुपये गुंतवायचे?

या योजनेत तुम्ही सिंगल किंवा जाइंट अशी दोन्ही खाती उघडू शकता. एका खात्यात तुम्ही जास्तीत जास्त 9 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. तर जॉइंट खात्यात जास्तीत जास्त 15 लाख रुपये गुंतवता येतात. जर तुम्ही आणि तुमच्या पत्नीने जॉइंट खातं उघडलं आणि त्यात 10 लाख रुपये गुंतवले. तर तुम्हाला वार्षिक 7.4 टक्के व्याज मिळेल. म्हणजेच प्रत्येक महिन्याला 6 हजार 167 रुपये जमा होतील. म्हणजेच वर्षाला एकूण 74 हजार रुपये हातात पडतील. प्रत्येक महिन्याला रक्कम थेट तुमच्या पोस्टच्या बचत खात्यात जमा होत राहील.

या योजनेत गुंतवणूक कशी कराल?

जवळच्या पोस्ट खात्यात जाऊन तुम्ही खातं उघडू शकता. यासाठी तुम्हाला काही महत्त्वाचे कागदपत्र द्यावी लागतील. यात आधारकार्ड आणि बँक अकाउंटची माहिती सोबत घेऊन जावं लागेल. खातं उघडण्यासाठी 1000 रुपये जमा करावे लागतील. तुम्ही 1000 रुपयांच्या पटीने पैसे जमा करू शकता. या योजनेचा मॅच्युरिटी कालावधी हा 5 वर्षे आहे. तुम्ही दर पाच वर्षांनी वाढवू शकात. मॅच्युरिटीपूर्वी तुम्ही पैसे काढू शकता. पण त्यासाठी काही नियम आहेत. एका वर्षाच्या आत पैसे काढल्यास 2 टक्के शुल्क आकारले जाते. तीन वर्षानंतर पैसे काढल्यास 1 टक्के वजा केले जातात.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.