Bird Flu | बर्ड फ्लूचा प्रभाव, अंड्यांचे भाव पुन्हा घसरले! देशभरातील पोल्ट्री व्यासायिक अडचणीत

येत्या काही दिवसांत ही परिस्थिती सुधारली नाही, तर देशभरातील सुमारे 20 टक्के पोल्ट्री फार्म बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

Bird Flu | बर्ड फ्लूचा प्रभाव, अंड्यांचे भाव पुन्हा घसरले! देशभरातील पोल्ट्री व्यासायिक अडचणीत

मुंबई : देशाची राजधानी दिल्लीच्या उत्तर महानगरपालिकेने अंडी आणि कोंबडीचे मांस यासंदर्भात नवीन आदेश जारी केला आहे. आता दिल्लीच्या हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये खवय्यांना चिकन आणि अंडी दिली जाणार नाहीत. जर, कोणी या नियमांचे उल्लंघन केले, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. बर्ड फ्लूचा प्रसार थांबवण्यासाठी दिल्ली सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या अहवालांच्या पार्श्वभूमीवर कुक्कुटपालन करणार्‍या शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. बर्ड फ्लूमुळे पोल्ट्री व्यावसायिकाचा आधीच गुंतवलेला खर्चही सुटत नाहीय. येत्या काही दिवसांत ही परिस्थिती सुधारली नाही, तर देशभरातील सुमारे 20 टक्के पोल्ट्री फार्म बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. यातच अंड्याचा भाव देखील उतरल्याने देशभरातील पोल्ट्री व्यासायिक अडचणीत आले आहेत (Eggs Price down due to bird flu).

देशातील दहा राज्यात बर्ड फ्लूची प्रकरण आढळली आहेत. बर्ड फ्लू आता दिल्ली आणि महाराष्ट्र या राज्यातही दाखल झाला आहे. यापूर्वीच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि केरळमध्ये बर्ड फ्लूचा प्रसार झाला होता. बर्ड फ्लूचा सामना करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत.

देशभरातील पोल्ट्री व्यासायिक अडचणीत

पोल्ट्री व्यावसायिक अनिल शाक्य यांनी टीव्ही 9सोबत बोलताना सांगितले की, ‘2019 पासून कुक्कुटपालकांची अवस्था अत्यंत वाईट आहे. आधी कोरोना, आता बर्ड फ्लूच्या बातमीने या उद्योगाला वाईट स्थितीत आणले आहे. दररोज लाखो अंडी साठून राहत आहेत. परंतु, ही अंडी साठवून देखील ठेवू शकत नाही अशा अवस्थेत शेतकरी अडकले आहेत. यावर उपाय म्हणून ते एकतर अगदी कमी किंमतीत अंड्यांची विक्री करत आहेत किंवा ही अंडी जमिनीत पुरत आहेत.’

अंडी आणि चिकनची किंमत घसरली

यूपी अंडी असोसिएशनचे अध्यक्ष नवाब अली यांनी टीव्ही 9ला सांगितले की, अंड्यांच्या किंमती सातत्याने घसरत आहेत. गुरुवारी अंड्यांचा दर 295 रुपये प्रति शेकडावर आला आहे. त्याचबरोबर पोल्ट्री व्यवसायिकांकडून अंडी अडीच ते तीन रुपयांत खरेदी केली जात आहे. तथापि, त्याची सद्य किंमत 3.5 ते 4 रुपये इतकी आहे (Eggs Price down due to bird flu).

कसे ठरवले जातात अंड्याचे दर?

अंडी पोल्ट्रीपासून विक्रेत्याच्या दुकानात येईपर्यंत या किंमती 4 वेळा बदलतात. प्रथम दर राज्यानुसार ठरवले जातात. मग घाऊक विक्रेता आणि किरकोळ विक्रेता एकत्रितपणे दरासंदर्भात निर्णय घेतात. त्यानंतर ही अंडी ग्राहक आणि आपल्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचतात.

पोल्ट्री फार्म हाऊसचे मालक आणि यूपी पोल्ट्री फार्म असोसिएशनचे अध्यक्ष नवाब अली म्हणतात की, सध्या पोल्ट्री फार्ममधून 100 अंडी 295 रुपयांपर्यंत विकली जात आहेत. या पोल्ट्री फार्ममधून अंडी मोठ्या घाऊक विक्रेत्यापर्यंत पोहोचतात. वाहतूक आणि कामगार खर्च पकडून, ​​ या 100 अंड्यांवर 15 ते 20 रुपयांचा नफा होतो.

इथल्या मोठ्या घाऊक विक्रेत्याकडून छोटे घाऊक विक्रेते अंडी खरेदी करतात. परंतु, यात त्यांना जास्त नफा मिळत नाही. हे लोक 30 अंड्यांच्या क्रेटवर 3 ते 5 रूपये कमवतात. त्यानंतर उर्वरित किरकोळ विक्रेते बाजारातील मागणी व साठे या गोष्टी लक्षात घेऊन एक ते सव्वा रुपयांची कमाई करतात.

(Eggs Price down due to bird flu)

हेही वाचा :

Published On - 1:45 pm, Thu, 14 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI