AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EPFO UAN New Rules : पीएफ खातेदारांना मोठा झटका; EPFO पोर्टलवरून खास सुविधा बंद, नेमका काय बदल केला?

EPFO UAN New Rules : पीएफ खातेदारांना मोठा झटका बसलाय. epfo पोर्टलवरील दोन सुविधा इतरत्र हटविल्या आहेत.

EPFO UAN New Rules : पीएफ खातेदारांना मोठा झटका; EPFO पोर्टलवरून खास सुविधा बंद, नेमका काय बदल केला?
| Updated on: Jul 04, 2026 | 1:37 PM
Share

पीएफ खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी हाती आली आहे. कर्मचारी भविष्यनिधी संघटनेने  (EPFO) युनिफाइड मेंबर पोर्टल अपग्रेड केल्यानंतर आणखी एक बदल केला आहे. आता पीएफ खातेदारांना वेबसाइटवर UAN अॅक्टिव्हेट करता येणार नाही. त्याचबरोबर दुसरा देखील UAN तयार करता येणार नाही.

कर्मचाऱ्यांना करावे लागेल फेस ऑथेंटिकेशन 

ईपीएफओने वेबसाइटवर दोन महत्त्वपूर्ण सुविधा पूर्णपणे बंद केल्या नाहीत,परंतु या सुविधा केंद्र सरकारच्या UMANG अॅपवर शिफ्ट केल्या आहेत. आता नवीन आणि जुन्या सदस्यांना उमंग अॅपचा वापर करावा लागणार आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर ईपीएफओने UAN अॅक्टिव्हेशन आणि अलॉटमेंटच्या आधारावर फेस ऑथिंटेकशन अनिवार्य करण्यात आलं आहे. याचा अर्थ चेहरा स्कॅन केल्यानंतरच ही प्रक्रिया पूर्ण होईल. आता तुम्हाला सर्वात आधी गुगल प्ले स्टोर किंवा अॅप्पल अॅप स्टोरवरून UMANG अॅप डाऊनलोड करावा लागेल. अॅप उघडल्यानंतर EPFO Services पर्याय निवडावा लागेल. आता UAN Services Through Face Auth अंतर्गत UAN Activation वर क्लिक करावे. त्यानंतर फेस ऑथेंटिकेशन पूर्ण करावे.

कर्मचाऱ्यांना करावे लागेल कागदपत्रे अपलोड 

ज्या कर्मचाऱ्यांना UAN जनरेट करायचे आहे. त्यांना उमंग अॅपवर जाऊन ‘UAN Allotment and Activation’ वर क्लिक करावे लागेल. यानंतर आधार फेस ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला UAN मिळेल. खरंतर UAN पुन्हा मिळवण्यासाठी प्रक्रिया आणखी सोपी करण्यात आली आहे. आता यासाठी तुम्हाला नोंदणीकृत नंबर टाकावे लागेल. त्यानंतर ओळखपत्र/घराचा पत्ता यांसारखी कागदपत्रे अपलोड करावी लागेल. पुढे मोबाईलवर ओटीपी आल्यानंतर व्हेरिफाय करावा लागेल. आता ईपीएफओ पोर्टलवर डेथ क्लेम फाइल करण्याची सुविधा मिळत राहील. याच्या लाभार्थ्यांसाठी आधार लिंक मोबाईल, मृत्यूप्रमाणपत्र, बँक कागदपत्रे यांसारखे पुरावे PDF फॉर्मेटमध्ये अपलोड करावे लागतील. तसेच ही पीडीएफ फाइल 2MB पेक्षा मोठी नसावी. तुमची फाइल 2MB पेक्षा मोठी असल्यास तुम्हाला इतर अॅपचा वापर करून कमी करून घ्यावी लागेल. त्यानंतर तुमचे काम सोयीस्कर होईल.

Follow Us
ही चोरी नाही, राम मंदिरावर दरोडा; संजय राऊतांचा सर्वात मोठा हल्लाबोल!
Sanjay Raut UNCUT | ही चोरी नाही, राम मंदिरावर दरोडा; संजय राऊतांचा सर्वात मोठा हल्लाबोल! नेमकं काय म्हणाले?
शिंदे गटात प्रवेश करताच महिला पदाधिकाऱ्याला पक्षाकडून मोठं गिफ्ट?
शिंदे गटात प्रवेश करताच महिला पदाधिकाऱ्याला पक्षाकडून मोठं गिफ्ट? मध्यरात्री 1:15  वाजता पार पडलेल्या पक्षप्रवेशात...
पर्यटनासाठी चालेले आहात? ही बातमी तुमच्यासाठीच, महाबळेश्वरमध्ये जमीन
पर्यटनासाठी चालेले आहात? ही बातमी तुमच्यासाठीच, महाबळेश्वरमध्ये जमीन खचली, चक्क 233...
Power Corrupts...; ठाकरेंची पोस्ट व्हायरल! साटम प्रकरणावर सरकारला घेरल
Raj Thackeray | Power Corrupts...; राज ठाकरेंची पोस्ट व्हायरल! अमित साटम प्रकरणावर सरकारला घेरलं
मुसळधार पावसाने अंधेरी ठप्प! वीरा देसाई रोडने घेतले नदीचे रूप
Andheri Veera Desai Road | मुसळधार पावसाने अंधेरी ठप्प! वीरा देसाई रोडने घेतले नदीचे रूप, दुकानदारांचे मोठे नुकसान
मोठी घडमोड! ठाकरेंना धक्का देत शिंदे गटात प्रवेश करताच पदाधिकाऱ्याचं
मोठी घडमोड! ठाकरेंना धक्का देत शिंदे गटात प्रवेश करताच महिला पदाधिकाऱ्याचं मोठं विधान; थेट नाव...
हाहाकार! मुसळधार पावसामुळे विरार महापालिका परिसर पाण्याखाली; थेट मुख्य
हाहाकार! मुसळधार पावसामुळे विरार महापालिका परिसर पाण्याखाली; थेट मुख्य कार्यालयात...
मुंबईत पावसाची तुफान बॅटिंग! प्रशासनाचा घराबाहेर न पडण्याचा इशारा....
धो धो येतो आणि झोडतच राहतो... मुंबई उपनगरात पावसाची तुफान बॅटिंग! प्रशासनाचा घराबाहेर न पडण्याचा इशारा
मोठी अपडेट समोर! उपमुख्यमंत्री रात्री उशीरा 1 वाजेपर्यंत सुरू असलेल्या
DCM Health Update | मोठी अपडेट समोर! उपमुख्यमंत्री रात्री उशीरा 1 वाजेपर्यंत पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात असतानाच...
दादर फुल मार्केटवर कोसळला 100 वर्ष जुना वड! तक्रारी करूनही BMC झोपेत
Mumbai | दादर फुल मार्केटवर कोसळला 100 वर्ष जुना वड! वारंवार तक्रारी करूनही BMC झोपेत; थोडक्यात...