EPFO | ईपीएफओच्या आकड्यांनी पुन्हा पोलखोल; देशात रोजगार निर्मिती घटली, तरुणांची नोकऱ्यांसाठी वणवण

मागील तीन महिन्यांत देशातील रोजगाराची परिस्थिती चिंता वाढविणारी आहे. पहिल्यांदा नोकरी मिळविणा-या देशातील तरुणांची संख्या कमालीची घटली आहे. ईपीएफओच्या ताज्या आकड्यावरुन ही चर्चा झडली आहे. तरुणांसाठी ही मोठी चिंतेची बाब मानण्यात येते.

EPFO | ईपीएफओच्या आकड्यांनी पुन्हा पोलखोल; देशात रोजगार निर्मिती घटली, तरुणांची नोकऱ्यांसाठी वणवण
EPFO
Follow us
| Updated on: Dec 22, 2021 | 3:50 PM

मुंबई : एकीकडे 12 लाख 70 हजार नोकरदारांनी ईपीएफओ मध्ये (EPFO) नोंदणी केल्याची शेखी मिरवण्यात आली. पण या आकडेवारीनेच देशात रोजागाराची स्थिती मजबूत असल्याचा सरकारचा दावा हाणून पाडला. या आकडेवारीने दाव्याची पोलखोल केली. देशात रोजगार निर्मिती होत नसून देशपातळीवर बेरोजगार तरुणांच्या फौजा नोकरीसाठी तयारीत लागल्याचे चित्र आहे.

कोरोनाच्या दोन लाटांचा जोरदार तडाखा भारतीय अर्थव्यवस्थेलाही बसला. सरकार अर्थव्यवस्था मजबूत वळणावर आणण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी आवश्यक उपाययोजना करत असली तरी आणि अनेक योजना राबवत असली तरी ग्राऊंड लेव्हलवर त्याचे परिणाम कितपत झाले याचा लेखाजोखा समोर आलेला नाही. देशात किती रोजगार वाढला आणि बेरोजगारी वाढली याची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यास कोणतेही सरकार कचरतेच. पण ईपीएफओच्या माध्यमातून देशाचा सूर कळतो.

आकडेवारी काय सांगते?

देशात रोजगार घटल्याचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या आकडेवारीवरुन अंदाज बांधता येतो. ईपीएफओच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्यात 12 लाख 70 हजार लोकांनी नोंदणी केली. त्यानुसार त्यांना रोजगार प्राप्त झाला आहे. तर जुलै महिन्यात हा आकडा 12 लाख 30 हजार होता. हे आकडे चिंताजनक आहे. तीन महिन्यांत रोजगार वाढीचा दर यामुळे स्पष्ट होतो. तर ऑगस्ट महिन्यात पहिल्यांदा नोकरी मिळवणाऱ्या तरुणांचा आकडा एकूण 14 लाख 80 हजार तरुणांमध्ये 9 लाख 10 हजार इतका होता. सप्टेंबरमध्ये 15 लाख 41 हजार लोकांना नवीन रोजगार मिळाला. त्यातील 8 लाख 95 हजार जणांचा ही पहिली नोकरी होती. तर ऑक्टोबर महिन्यात 12 लाख 70 हजार जणांची नोंदणी झाली. त्यात पहिल्यांदात नोकरी मिळवणाऱ्या तरुणांची संख्या 7 लाख 50 हजार इतकी होती. हा आकडा कमी होत असल्याने चिंता वाढली आहे.

ईपीएफओचं काम कसं चालतं

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची स्थापना 1952 साली करण्यात आली. केंद्र सरकार अंतर्गत सामाजिक सुरक्षेसाठी निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना सुरक्षा मिळावी, यासाठी ती सुरु करण्यात आली आहे. ज्या आस्थापनांमध्ये 20 हून अधिक कर्मचारी काम करतात त्यांना ईपीएफओ अन्वये कर्मचाऱ्यांची नोंदणी करणे अनिवार्य आहे. 15 नोव्हेंबर 1951 रोजी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची स्थापना करण्याचा अध्यादेश काढण्यात आला होता. 1952 साली कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना देशभर लागू करण्यात आली.

संबंधित बातम्या :

EPFO Balance Enquiry : ईपीएफओ सदस्य ‘या ‘पद्धतीनं चेक करू शकतात ऑनलाइन बॅलन्स

Unique Digital Health ID card | युनिक डिजिटल हेल्थ आयडी, आरोग्याच्या जन्मकुंडलीची स्टेप बाय स्टेप माहिती

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.