AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुढीपाडवा झाला गोड, सर्वसामान्यांना मोठा दिलासा, खाद्यतेल होणार स्वस्त

Edible Oil Price : गुढीपाडवा आता एकदम तोंडावर आला आहे. त्यापूर्वीच खाद्यतेल स्वस्ताईची आनंदवार्ता येऊन धडकली आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम आहे. मराठी नववर्षांची चाहुल लागलेली असताना किचन बजेटवरील ताण कमी झाल्याची ही आनंदवार्ता येऊन धडकली.

गुढीपाडवा झाला गोड, सर्वसामान्यांना मोठा दिलासा, खाद्यतेल होणार स्वस्त
खाद्यतेलाच्या किंमतींचा दिलासा
| Updated on: Apr 07, 2024 | 4:07 PM
Share

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर खाद्यतेलाने आनंदवार्ता आणली आहे. खाद्यतेलाच्या किंमती घसरल्या आहेत. केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षांपासून खाद्यतेलाचे दाम आटोक्यात आणण्यासाठी अनेक उपाय योजना केल्या आहेत. लहरी निसर्गाने त्यात खुटी ठोकली असली तरी आयातीने सरकारला तारले आहे. गेल्या एक वर्षांपासून खाद्यतेलाच्या आघाडीवर सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील खाद्यतेल-बियाणे बाजारात सर्व तेलाच्या किंमतीत बदल दिसून आला. मोहरी, शेंगदाणे, सोयाबीन तेल, तेलबिया, कच्चे पाम तेल, पामोलिन तेल, कापसाच्या तेलात तेजीचे सत्र दिसून आले.

मोहरीची आवक वाढली

बाजारातील तज्ज्ञांनुसार, या पुनरावलोकनाधीन आठवड्यापासून मोहरीची बाजारात मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. 16-16.25 लाख पोतीपर्यंत मोहरी बाजारात दाखल झाली आहे. हरियाणा आणि श्रीगंगानगर येथील मोहरीचे पीक थोडे उशीरा येते. एप्रिलच्या अखेरपर्यंत मोहरीची मोठ्या प्रमाणात आवक वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना ही आवक 9-9.25 लाख पोत्यांवरच स्थिरावली.

MSP वर सरकारकडून खरेदी

  • दरम्यान अनेक राज्यांनी किमान आधारभूत किंमतीआधारे (MSP) सरकारने खरेदी सुरु केली आहे. काही तज्ज्ञांनी येत्या काही दिवसांत सूर्यफूल (Sunflower) आणि सोयाबीनची (Soybean) आयात वाढण्याची शक्यता वर्तवित होते. पण त्यांचा अंदाज फसला. मोहरीचा भाव पाडण्यासाठी ही चर्चा घडवल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
  • सूत्रांच्या माहितीनुसार, अल्पभूधारक आणि छोटी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनीच माल बाजारात आणला आहे. पण अजून मोठे आणि मध्यम शेतकरी चांगल्या भावाच्या प्रतिक्षेत माल बाजारात आणत नसल्याचा दावा करण्यात येत आहे. हे शेतकरी किमान आधारभूत किंमती वाढण्याच्या प्रतिक्षेत आहे. एप्रिलमध्ये मोहरीची आवक 15-16 लाख पोती येण्याची गरज होती, पण आता 9.9.25 लाख पोती बाजारात आली आहे.

सोयाबीनचे दाम घसरले

सूत्रांच्या माहितीनुसार, खाद्यतेलाचा पुरवठा अद्याप वाढलेला नाही. पण घाऊक बाजारात तेलाची मागणी वाढली आहे. सोयाबीनचे दाम घसरल्याने शेतकरी हैराण आहे. सध्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा पण सोयाबीनचा भाव कमी आहे. अनेक बाजारात सध्या सोयाबीन आणि तिळाच्या तेलाचा साठा असल्याचे समोर आले आहे. आयातीत तेलाच्या किंमती पण स्वस्त झाल्याने बाजारात पुन्हा तेलाचे दाम कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?.
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?.
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!.
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी.
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!.
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.