AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फार्मा कंपनीतून पैसे कमवण्याची संधी, पाच कंपन्या 7,000 कोटींचा आयपीओ आणण्याच्या तयारीत

सेन्सेक्स आणि निफ्टी याला एका नवीन शिखरावर पोहोचवण्यासाठी फार्मा कंपनीची कामगिरी वर्षभरात सर्वोत्कृष्ट होती. (Five pharma companies line up Rs 7000 crore IPOs)

फार्मा कंपनीतून पैसे कमवण्याची संधी, पाच कंपन्या 7,000 कोटींचा आयपीओ आणण्याच्या तयारीत
| Updated on: May 28, 2021 | 11:05 AM
Share

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव संपत नाही तोच तिसरी लाट येण्याचे संकेत दिले जात आहे. अनेक औषध उत्पादक आणि लाईफ सायन्स कंपन्या येत्या काही महिन्यात बाजारात 7,000 कोटींचा आयपीओ गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहेत. (Five pharma companies line up Rs 7,000-crore IPOs)

अनेक गुंतवणूकदार बँकांच्या मते, ग्लेनमार्क लाइफसायन्सेज (Glenmark Lifesciences), औषध निर्माता कंपनी सुप्रिया लाइफसायन्सेज (Supriya Lifesciences), औषध उत्पादक कंपनी विंडलास बायोटेक (Windlass Biotech), एमक्योर फार्मा (Emcure Pharma) आणि सीएक्स पार्टनर्सच्या फंडेड वीडा क्लिनिकल रिसर्च (Veeda Clinical Research) यांनी सुरुवातीच्या पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) सुरू करण्याची योजना तयार केली आहे.

7 हजार कोटी गुंतवणुकीची शक्यता

गुंतवणूकदार बँकरच्या म्हणण्यानुसार या कंपन्या आयपीओच्या (IPO) माध्यमाद्वारे भांडवली बाजारातून 7,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा करण्याचा विचार करत आहे. आर्थिक वर्ष 2020-21 दरम्यान आयपीओ क्षेत्राने सर्वोत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. तसेच सेन्सेक्स आणि निफ्टी याला एका नवीन शिखरावर पोहोचवण्यासाठी फार्मा कंपनीची कामगिरी वर्षभरात सर्वोत्कृष्ट होती.

फार्मा शेअर्समध्ये 501 टक्के परतावा

आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये आरती फार्मा (Arti Pharama) कंपनीच्या शेअर्समध्ये 501 टक्के परतावा मिळाला आहे. तर ग्रानुएल्स (Granuels) च्या शेअरमध्ये 201 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच  एंड बी चेम (J&B Chem) शेअर्समध्ये 145 टक्के, ऑरबिंदो फार्मा (Aurobindo Pharma) चा परतावा दुप्पट झाला आहे. तसेच डिवी (Divi) च्या शेअर्स 104 टक्क्यांनी वाढले आहेत. तर  इप्का लैब्स (Ipca Labs) मध्ये 97 टक्के आणि अजिंठा फार्माच्या शेअर्समध्ये 72 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळेच वर्षभरात मुंबई शेअर बाजारात Health group index हा नवीन शिखरावर पोहोचला आहे.

भारतीय बाजारपेठेच्या तुलनेत जागतिक बाजारपेठेत 50 टक्क्यांपर्यंत लसींचा पुरवठा होत आहे. तर 40 टक्के जेनेरिक औषधे अमेरिकेत आणि 25 टक्के औषधे ब्रिटनला पुरविली जातात. देशांतर्गत औषध बाजारपेठेत 2019-20 दरम्यान 1.4 लाख कोटींची आर्थिक उलाढाल झाली. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच येत्या 2025 पर्यंत फार्मास्युटिकल व्यवसायाची आर्थिक उलाढाल ही अंदाजे 100 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. (Five pharma companies line up Rs 7,000-crore IPOs)

संबंधित बातम्या : 

GST Council Meeting : जीएसटी परिषदेची आज 43 वी बैठक, ‘या’ महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा

1 रुपयाचं, 10 रुपयाचं नाणं बंद झालंय का? चालणार नाही? RBI कडून स्पष्टीकरण

यंदाच्या आर्थिक वर्षातील RBI चा अहवाल जारी, 5,45,00,080 बनावट नोटा जप्त, कोणत्या चलनाच्या किती बनावट नोटा?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.