AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FM Nirmala Sitharaman : केंद्राकडून मोठं दिवाळी गिफ्ट, ‘प्रोत्साहन’ पॅकेजची घोषणा

केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पुन्हा विशेष पॅकेज जाहीर करण्याबाबत एकमत झाल्याने आज यावर महत्त्वाची घोषणा करण्यात आली.

FM Nirmala Sitharaman : केंद्राकडून मोठं दिवाळी गिफ्ट, 'प्रोत्साहन' पॅकेजची घोषणा
| Edited By: | Updated on: Nov 12, 2020 | 1:51 PM
Share

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री (Finance Minister) निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी तिसऱ्या आत्मनिर्भर पॅकेजची घोषणा केली आहे. कोरोना काळात भारतीय अर्थव्यवस्थेला आणखी मजबूत करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असून कोरोना संक्रमण देशात वाढत आहे. आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी यासंदर्भात माहिती दिली. कोरोनाविरुद्ध लढणं हे सर्वात मोठं आव्हान होतं. आवश्यक उपाययोजना केल्यामुळे भारताची अर्थव्यवस्था सावरतेय आहे असंही निर्मला सीतारमण यांनी सांगितलं. (fm nirmala sitharaman press conference live updates)

ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत अर्थव्यवस्था आणखी सुधारेल. त्याचबरोबर बँक क्रेडिटमध्ये 5.1 टक्के वाढ झाली. तर आरबीआयने भारतीय अर्थव्यवस्था चांगलं काम करत असल्याचा संकेत दिले आहेत अशी माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली.

कोरोनानंतर भारताचा रिकव्हरी पाहून मूडीजने आपला अंदाज बदलला. यापूर्वी मूडीजने यंदाच्या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी उणे (मायनस) 9.6 टक्के राहील असं सांगितलं होतं. मात्र, आता बदल करून तो यंदाच्या वर्षात उणे 8.9 टक्के राहील असं सांगितलं आहे. तर पुढील आर्थिक वर्षासाठी यापूर्वी मुडीजने 8.1 विकासदर अंदाज वर्तवला होता. तो आता बदल करून 8.6 टक्के असा सांगितला आहे.

वन नेशन वन रेशन कार्ड 01 सप्टेंबर 2020 पासून 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये वन नेशन वन रेशन कार्ड लागू करण्यात आलं आहे. 68.6 कोटी लाभार्थ्यांना याचा फायदा झाला.

किसान कार्डचे वाटप

मागील वर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत बँक क्रेडिटमध्ये 5.1 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे. याचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनाही फायदा झाला. आतापर्यंत 1.43 लाखां पेक्षा जास्त किसान क्रेडिट कार्डे देण्यात आले आहेत. शेतकर्‍यांसाठी मोठी पाऊलं उचलण्यात आली. किसान क्रेडिट कार्डसाठी 183.14 लाख अर्ज मिळाले होते. यापैकी 157.44 लाख पात्र शेतकऱ्यांना निवडण्यात आलं. दुसर्‍या टप्प्यात 143,262 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केलं गेलं.

पंतप्रधान स्वानिधी योजनेंतर्गत 26.62 लाख कर्जासाठी अर्ज

पंतप्रधान स्वानिधी योजनेंतर्गत 26.62 लाख अर्ज मिळाले. रस्ते विक्रेत्यांना पीएम स्वानिधी योजनेंतर्गत 13.78 लोकांना 1337.73 कोटी रुपयांचं कर्ज देण्यात आलं आहे. (fm nirmala sitharaman press conference live updates)

आत्मनिर्भर भारत रोजगार योजना – या योजनेअंतर्गत नवीन रोजगारांची निर्मिती करण्यात येणार आहे. – 1 मार्चा ते 30 सप्टेंबर काळात रोजगार गमावलेल्यांना यामध्ये ग्राह्य धरणार – नवीन कर्मचारी कामावर घेतले. – कोरोनात जॉब गेला त्यांना या योजनेचा फायदे मिळणार – पुढील दोन वर्षांसाठी या योजनेचा लाभ मिळणार

निर्मला सीतारमण यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे – तिसऱ्या आत्मनिर्भर पॅकेजची घोषणा – अर्थव्यवस्था हळूहळू रुळावर, – तिसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्था आणखी सुधारेल – मुडीजनी अर्थव्यवस्था सुधारण्याचे संकेत दिले – शेतकऱ्यांना 1.57 लाख किसान कार्डचे वाटप – 26 कोटी फेरीवाल्यांचे कर्जासाठी अर्ज – वन नेशन वन रेशनला मोठा प्रतिसाद, 68.8 कोटी लाभारार्थी – PM स्वनिधी योजनेअंतर्गत कर्जसाठी 26.62 लाख अर्ज – आत्मनिर्भर भारत रोजगार योजना 30 जुलै 2021पर्यन्त लागू करण्याची घोषणा. – EPF अंतर्गत नोंदणी कृत संस्था ला 2 पेक्षा जास्त संस्था ला EPFO चा लाभ देणार आहे. – केंद्र सरकार 2 वर्षासाठी विशेष सबसिडी उपलब्ध करून देणार आहे. – 1 हजार रोजगारावर सबसिडी उपलब्ध करून देण्यात येणार. कर्मचाऱ्यांचे 12 टक्के आणि संस्थेचे 12 टक्के PF चे पैसे केंद्र सरकार भरणार – 3 लाख कोटींची आपत्काळ गॅरंटी योजनेची घोषणा. 31 मार्च 2021 प्रयत्न योजना वाढवली – 20 टक्के कर्जाची रक्कम वाढवण्यात आली – 50 कोटी ते 250 कोटी रुपये टर्न ओव्हर असणाऱ्या संस्थाला फायदा मिळाला.

संबंधित बातम्या :

बचत खात्यात महिन्याला केवळ 1 रुपया जमा करा, अन्यथा 2 लाखाच्या फायद्याला मुकाल!

जनधन खात्याला आधारशी करा लिंक, अन्यथा नाही मिळणार 2.30 लाखांचा फायदा

(fm nirmala sitharaman press conference live updates)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.