AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

4 स्टेप्स, परफेक्ट यशाचा मंत्र, रतन टाटा यांचं आयुष्य बदलणारे टप्पे कोणते?

रतनजी टाटा यांचे यश चार टप्प्यात विभागता येईल. त्यांच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळेच समूहाची भरभराट झाली, असे म्हटले जाते.

4 स्टेप्स, परफेक्ट यशाचा मंत्र, रतन टाटा यांचं आयुष्य बदलणारे टप्पे कोणते?
Image Credit source: social media
| Edited By: | Updated on: Oct 31, 2022 | 4:03 PM
Share

नवी दिल्लीः जानेवारी 1998. प्रगती मैदानावरचा एक दिवस. टाटा मोटर्सचे चेअरमन रतन नवल टाटा (Ratan Tata) झगमगत्या स्टेजवर उभे राहिले. काही वेळात ते मोठी घोषणा करणार होते. Zen, Ambassador आणि Maruti 800 या तीन सर्वोपयोगी कार सादर झाल्या. टाटा इंडिकाची (Tata Indica) बुकिंगही त्याच वर्षी सुरु झाली. एक लाखाहून अधिक लोकांनी अॅडव्हान्स बुकींग केलं.

एवढं असूनही टाटा मोटर्स तोट्यात गेली. पण काही काळातच दिवस पालटले. इंडिका बेस्टसेलर बनली. टाटा मोटर्सने (TataMotars) नवी उंची गाठली. 2009 मध्ये रतन टाटांनी नॅनो लाँच केली. नव्वदी आणि 2000 च्या सुरुवातीच्या काळात टाटा ग्रुपमधील उणीवा दूर करण्याचं काम रतन टाटांनी केलं. 1991 मध्ये टाटा सन्स लिमिटेडचे चेअरमन बनल्यानंतर रतन टाटांचा प्रवास 4 टप्प्यांत विभागता येईल. यातून त्यांचं उद्योग जगतातला प्रवास दिसेल.

कॉर्नेल विद्यापीठातून रतन टाटांनी आर्किटेक्चरचं शिक्षण घेतलं. 1962 मध्ये भारतात आले. कारण त्यांची आजी आजारी होती. टाटा स्टील लिमिटेडच्या जमशेदपूर येथील प्लांटमध्ये ट्रेनिंग सुरु केली. 1977 मध्ये रतन टाटांना चांगली जबाबदारी मिळाली.

पण 1986 मध्ये मुंबई गिरणी कामगारांच्या संपामुळे कंपनी बंद पडली. यामुळे आता जेआरडी यांचे वारसदार रतन टाटा ठरतील, असे कुणालाही तेव्हा वाटले नव्हते. टाटांचे हेडक्वार्टर बॉम्बे हाऊसमध्ये त्यावेळी रतन टाटांना बाहेरची व्यक्ती म्हणूनच पाहिलं जात होतं.

त्यावेळी टाटा ग्रुपच्या वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या चालवत होते. जेआरडींनी त्यांना स्वातंत्र्य दिलं होतं. एवढ्या दावेदारांमधून रतन टाटांकडे उद्यागाची धुरा सोपवण्यात आली. कारण नव्या अध्यक्षांची कार्यपद्धती खूप वेगळी होती.

रतन टाटांच्या यशाचे 4 टप्पे-

टाटा सन्सची जबाबदारी हाती घेतल्यानंतर रतन टाटांनी सुरुवातीला जेआरडींच्या विविध कंपन्यांना डिसेंट्रलाइज्ड करायला सुरुवात केली. त्यानंतर रतन टाटांनी कंपन्यांची क्षमता वाढवण्यास सुरुवात केली. तिसरा टप्पा होता ग्लोबलायझेशनचा. आज टाटा ग्रुपचा जवळपास 58% महसूल जागतिक व्यवहारांतून येतो. चौथा टप्पा होता इनोव्हेशनचा. ही तर टाटा समूहाची सध्याची खासियत आहे.  दुसरा, तिसरा आणि चौथा टप्पा अजूनही अखंड सुरु आहे. टाटा ग्रुप आणि रतन टाटांची ही कहाणी.. वृद्धी, स्पर्धा, उत्पादकतेची, क्षमतेची, जागतिकीकरणाची, नूतनीकरणाची…

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.