दहशतवादी संघटनांना झाला अर्थ पुरवठा, जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टो फर्मवर कारवाईची टांगती तलवार

Binance Terror Funding | क्रिप्टो करन्सी जगताला हादरवणारी बातमी समोर आली आहे. क्रिप्टो करन्सी हे वेगळंच जग आहे. सर्वसामान्यांना या चलनाविषयी ऐकीव माहिती आहे. Binance ही मोठी क्रिप्टो फर्म आहे. या फर्मवर आता अमेरिकेची वक्रदृष्टी पडली आहे. या फर्ममार्फत दहशतवादी संघटनांना वित्त पुरवठा झाल्याचे समोर आले आहे. काय आहे नेमकं प्रकरण

दहशतवादी संघटनांना झाला अर्थ पुरवठा, जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टो फर्मवर कारवाईची टांगती तलवार
Follow us
| Updated on: Nov 23, 2023 | 10:20 AM

नवी दिल्ली | 23 नोव्हेंबर 2023 : क्रिप्टो जगात Binance हे नाव सर्वात मोठं आहे. ही क्रिप्टो फर्म या बाजारातील दादा आहे. या फर्मचे प्रमुख चांगपेंग झाओ याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. या फर्ममार्फत दहशतवाद्यांना, त्यांच्या संघटनांना मोठा वित्त पुरवठा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे क्रिप्टो बाजारात एकच खळबळ माजली आहे. बिनयान्सचे सीईओ झाओ हा आरोपांची राळ उठल्यानंतर लागलीच पायउतार झाला. त्याने बुधवारी राजीनाम देत असल्याचे जगजाहीर केले. अमेरिकेच्या मनी लॉड्रिंग, आर्थिक गैरव्यवहारांशी संबंधित कायद्यान्वये चौकशीचा ससेमिरा Binance च्या पाठीमागे लागला आहे.

माझ्याकडून चूक झाली

झाओने एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. आपण आज पदावरुन पायउतार होत असल्याचे त्याने सांगितले. हा भावनिक क्षण आहे. पण सध्याच्या घडीला हीच एक चांगली कृती असू शकते, असे मत त्याने व्यक्त केले. माझ्याकडून चूकी झाली आणि त्याची जबाबदारी मी घेत असल्याचे त्याने सांगितले. Binance ने आता कुठे बाळसं धरलं आहे. या संस्थेला अजून मोठी भरभराट पाहायची आहे. प्रगती साधायची आहे. मैलाचा दगड रोवायचा आहे, अशा भावना त्याने या पोस्टमध्ये व्यक्त केल्या आहेत. झाओच्या जागेवर रिचर्ड टेन्ग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहेत आरोप

Binance ने अमेरिकेतील आर्थिक गैरव्यवहारासंबंधीच्या कायद्याचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. हमास, अल कायदा, इसीस अशा दहशतवादी संस्थांना क्रिप्टो करन्सीमार्फत रसद पुरविण्यात येत असल्याचे गेल्या दोन वर्षांपासून ओरड होत होती. हमास-इस्त्राईल यांच्या युद्धानंतर या प्रकरणात अमेरिकेने लक्ष घातले. त्यावेळी धक्कादायक बाबी समोर आल्या. Binance फर्ममार्फत करण्यात आलेले 1,00,000 व्यवहार चौकशी संस्थांच्या रडारवर आले आहेत. हे सर्व व्यवहार संशयाच्या फेऱ्यात अडकले आहेत. यामाध्यमातून दहशतवादी संघटनांना मोठा आर्थिक पुरवठा केल्याचे समोर आले आहे.

आता झाओ काय करणार

आता मोठा ब्रेक घेणार असल्याचे झाओने स्पष्ट केले. या ब्रेकनंतर नवीन स्टार्टअप्सविषयी काही तरी करण्याची आशा आहे. ब्लॉकचेन, वेब3, डेफी, एआय, बायोटेक या क्षेत्रात काहीतरी करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे. पण कोणत्याही स्टार्टअप्सच्या सीईओपदी मी स्वतःला बघत नसल्याचे त्याने स्पष्ट केले.

म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर.
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार.
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?.
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान.
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले..
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले...
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी.
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार.
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी.
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी.
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार.