Gautam Adani : 1 अब्ज डॉलरची डील; मुंबई विमानतळाचं रुपडं पालटणार, काय आहे अदाणींचा मेगा प्लॅन?
Mumbai Airport : भारतातील अदानी एअरपोर्ट्स होल्डिंग लिमिटेड अंतर्गत (AAHL) येणार्या विमानतळांचे रुपडे पालटणार आहे. अदानी समूहाने त्यासाठी 1 अब्ज डॉलरच्या एका प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे. मुंबई विमानतळाचे त्यातून रुपडे पालटणार आहे.

भारतीय विमानतळांना अत्याधुनिक रूप देण्यासाठी अदानी समूह सज्ज झाला आहे. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्सची सहाय्यक कंपनी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने विकास आणि अत्याधुनिकतेसाठी 1 दशलक्ष डॉलरचा निधी जमावला आहे. एका खासगी कंपनीसोबत अदानी समूहाने हा करार केला आहे. या करारामुळे भारतीय विमानतळाचा चेहरामोहरा बदलून जाईल. मुंबई विमानतळाचे रुपडे पालटून जाईल. परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय कंपन्यांवरील विश्वास दृढ होईल.
हा करार आहे तरी काय?
अदाणी इंटरप्रायजेसच्या हवाई तळ विभाग, अदाणी एअरपोर्ट्स होल्डिंगला या महिन्याच्या सुरुवातीलाच जागतिक बँकांचा एका संघाने 750 दशलक्ष डॉलरची मदत केली आहे. जुलै 2029 पर्यंत या माध्यमातून अनेक बदल होतील. याशिवाय, 250 दशलक्ष डॉलर जमा करण्याचा एक पर्याय पण समोर आला आहे. त्याची एकूण राशी 1 अब्ज डॉलर इतकी आहे. या निधीचा मुख्य वापर हा मुंबई विमानतळाच्या नूतनीकरणासाठी करण्यात येईल.
कोणी केली गुंतवणूक?
या प्रकल्पासाठी ॲपोलो मॅनेजड फंड्सने आर्थिक मदत केली आहे. याशिवाय इतर जागतिक कंपन्यांमध्ये अमेरिकेतली प्रसिद्ध गुंतवणूक संस्था ब्लॅकरॉक (BlackRock) आणि स्टँडर्ड चार्टर्ड (Standard Chartered) यांनी मोठा वाटा उचलला आहे. या गुंतवणुकीमुळे आता मुंबई विमानतळाचा चेहरा मोहरा बदलण्यास मदत होईल. अनेक कामं करण्यात येईल. हे विमानतळ हिरवळीने नटेलच पण त्यामध्ये अत्याधुनिक सोयी-सुविधा पण देण्यात येतील. त्यामुळे प्रवाशांना जागतिक विमानतळाचा फील येईल.
काय होईल फायदा?
अदाणी समूहाने या मॉड्यूलमधून मुंबई विमानतळाला एक ट्रॅव्हल हबच नाही तर एरो-ट्रॉपोलिस मध्ये बदलावे लागेल. या रक्कमेतून प्रवाशी आणि मालवाहतूक सोयी-सुविधा पुरवाव्या लागतील. व्यावसायिक आणि रहिवास झोन विकसीत करावे लागतील. पर्यावरण संवर्धनासाठी पण निधी वापरावा लागेल. झिरो एमिशनवर लक्ष केंद्रित करावे लागेल. या कराराच्या माध्यमातून मुंबई विमानतळ स्मार्ट, ग्रीन आणि भविष्यातील अत्याधुनिक सोयी-सुविधा देणारे असेल. जागतिक एव्हिएशन हबमध्ये भारताचे हे मोठे पाऊल मानण्यात येत आहे. इतर विमानतळांचा पण लवकरच कायापालट होण्याची शक्यता आहे.
