AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुकेश अंबानींचा ताज गेला… गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, या कारणामुळे संपत्ती वाढली

Adani vs Ambani : श्रीमंतांच्या यादीत पुन्हा एकदा मोठा उलटफेर झाला आहे. गौतम अदाणी यांनी मुकेश अंबानी यांना मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान मिळवला आहे.

मुकेश अंबानींचा ताज गेला... गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, या कारणामुळे संपत्ती वाढली
adani vs AmbaniImage Credit source: Google
| Updated on: Apr 17, 2026 | 3:53 PM
Share

मुकेश अंबानी आणि गौतम अदानी हे भारतातील दोन दिग्गज उद्योगपती आहेत. दोघांमध्ये नेहमी श्रीमंतीच्या बाबतीत स्पर्धा सुरू असते. अशातच आता श्रीमंतांच्या यादीत पुन्हा एकदा मोठा उलटफेर झाला आहे. गौतम अदाणी यांनी मुकेश अंबानी यांना मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान मिळवला आहे. ताज्या क्रमवारीनुसार, गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 92.6 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे, तर मुकेश अंबानी यांची संपत्ती 90.8 अब्ज डॉलर इतकी आहे. संपत्तीतील या वाढीमुळे अदानी आता केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण आशियात सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

अदानींची संपत्ती का वाढली?

समोर आलेल्या माहितीनुसार, अदानी समूहाच्या शेअर्समध्ये अलीकडे मोठी वाढ दिसून आली आहे. बंदरे, ऊर्जा आणि पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर) क्षेत्रांमधील कंपन्यांवर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत आहे. याच कारणामुळे अदानी समूहाच्या बाजारमूल्यात अब्जावधी डॉलरची वाढ झाली असून त्याचा थेट परिणाम अदानी यांच्या संपत्तीत दिसून आला आहे. यात कारणामुळे अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

अंबानींची वाढ मर्यादित

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या संपत्तीतही वाढ झाली आहे, मात्र ती अदानी यांच्या तुलनेत कमी आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचा व्यवसाय तेल-गॅस, दूरसंचार आणि किरकोळ (रिटेल) क्षेत्रांमध्ये पसरलेला असला तरी अलीकडच्या काळात त्याच्या वाढीचा वेग कमी राहिला आहे. त्यामुळे अदानींना अंबानींना मागे टाकले आहे.

जागतिक क्रमवारीत कितव्या स्थानी?

ब्लूमबर्गच्या क्रमवारीनुसार, गौतम अदानी सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 19व्या स्थानावर आहेत. या यादीत पहिल्या क्रमांकावर एलॉन मस्क आहेत, ज्यांची संपत्ती 656 अब्ज डॉलर आहे. तर लॅरी पेज 286 अब्ज डॉलर संपत्तीसह दुसऱ्या आणि जेफ बेझोस 269 अब्ज डॉलर संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहेत.

दरम्यान, अदानी आणि अंबानी यांच्यात सर्वात श्रीमंत व्यक्तीसाठी गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा सुरू आहे. 2022 मध्ये अदानी यांनी पहिल्यांदा अंबानींना मागे टाकले होते, पण हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये घसरण झाली आणि अंबानी पुन्हा अव्वल स्थानावर पोहोचले होते. मात्र, आता पुन्हा गौतम अदानी यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे.

Follow Us
तो 15 लाख कोटींचा घोटाळा करतो अन्... संजय राऊतांचं थेट विधान; नेमकं...
तो 15 लाख कोटींचा घोटाळा करतो अन्... संजय राऊतांचं थेट विधान; नेमकं प्रकरण काय?
शिंदे गटाचं ऑपरेशन अमित शहांनी 100 वेळा केलं; राऊतांचा स्फोटक हल्लाबोल
Sanjay Raut | शिंदे गटाचं ऑपरेशन अमित शहांनी 100 वेळा केलं; संजय राऊतांचा स्फोटक हल्लाबोल!
शरद पवारांना राज्यसभेचं मोठं पद, उद्धव ठाकरेंना काँग्रेसची कमान?
शरद पवारांना राज्यसभेचं मोठं पद, उद्धव ठाकरेंना काँग्रेसची कमान? भाजपच्या बड्या नेत्याने काढला चिमटा
राणा दाम्पत्याचं नाव पुन्हा चर्चेत! मंत्री बावनकुळेंशी बंद दाराआड...
राणा दाम्पत्याचं नाव पुन्हा चर्चेत! मंत्री बावनकुळेंशी बंद दाराआड चर्चा; नेमकं काय घडलं?
आज अल्टिमेटम नाही... पण उद्यापासून काय? पवारांच्या आंदोलनातून इशारा!
Rohit Pawar Protest | आज अल्टिमेटम नाही... पण उद्यापासून काय? रोहित पवारांच्या आंदोलनातून सरकारला मोठा इशारा!
क्षणात बदललं चित्र! वादळी वाऱ्याचं थैमान; छते उडाली, सिरसे गावात.....
Nashik | क्षणात बदललं चित्र! वादळी वाऱ्याचं थैमान; छते उडाली, झाडे पडली, सिरसे गावात हाहाकार
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द