बिटकॉइन टिक्का, इथेरियम बटर चिकन, ‘या’ हॉटेलमध्ये मिळतेय क्रिप्टो थाळी, पेमेंटसाठीही क्रिप्टोकरन्सीचा वापर

Ardor 2.1 हॉटेलमध्ये डिजिटल थाली (शाकाहारी आणि मांसाहारी दोन्हीसाठी उपलब्ध) मध्ये क्रिप्टोग्राफीच्या नावावर अनेक पदार्थ आहेत. यामध्ये पॉलीगॉन पिटा आणि फलाफेल, चिली फ्राईजसह बर्गर, सोलाना चाना भातुरा, कु एथेरियम बटर चिकन, डोगे फ्राईड राइस आणि बिटकॉइन टिक्का अशा डिशेसचा समावेश आहे. | Crypto Thali

बिटकॉइन टिक्का, इथेरियम बटर चिकन, 'या' हॉटेलमध्ये मिळतेय क्रिप्टो थाळी, पेमेंटसाठीही क्रिप्टोकरन्सीचा वापर
क्रिप्टो थाली
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Rohit Dhamnaskar

Oct 06, 2021 | 12:40 PM

नवी दिल्ली: अलीकडच्या काळात दैनंदिन व्यवहारातही क्रिप्टोकरन्सीचा वापर वाढत आहे. भारतात क्रिप्टोकरन्सीचे कोणतेही नियमन नसले तरी, दररोज नवीन लोक क्रिप्टो मार्केटमध्ये सामील होत आहेत. हे पाहता दिल्लीतील काही व्यावसायिकांनी क्रिप्टोकरन्सी स्वीकारणे सुरू केले आहे. आता तुम्ही तुमच्या क्रेडिट/डेबिट कार्ड, रोख किंवा डिजिटल पेमेंटऐवजी बिटकॉइन, इथेरियम, डॅश, डोगेकोइन, लाइटकोइन सारख्या आभासी चलनांमध्ये हॉटेलचे बिल भरू शकता.

दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमधील Ardor 2.1 रेस्टॉरंटने क्रिप्टो थाली सुरू केली आहे. ग्लोबल क्युझीन थाळीवर, व्हर्च्युअल चलनाद्वारे पेमेंट केल्यावर 40 टक्के सूट दिली जाईल. यासाठी तुम्ही बिटकॉइन, डॅश, डोगेकोइन, लाइटकोइन, इथरियमचा वापर करु शकता. यापू४वी रेस्टॉरंटने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बाहुबली थाली, युनायटेड इंडिया थाली आणि 56-इंच थाली लाँच केली होती.

खाद्यपदार्थांची मजेशीर नावं

Ardor 2.1 हॉटेलमध्ये डिजिटल थाली (शाकाहारी आणि मांसाहारी दोन्हीसाठी उपलब्ध) मध्ये क्रिप्टोग्राफीच्या नावावर अनेक पदार्थ आहेत. यामध्ये पॉलीगॉन पिटा आणि फलाफेल, चिली फ्राईजसह बर्गर, सोलाना चाना भातुरा, कु एथेरियम बटर चिकन, डोगे फ्राईड राइस आणि बिटकॉइन टिक्का अशा डिशेसचा समावेश आहे.

या रेस्टॉरंटचे मालक सांगतात की आम्ही आमच्या पाहुण्यांना पूर्णपणे डिजिटल मेनूसह काही डिजिटल अनुभव देण्याचे ठरवले आहे. माझ्या एका मित्राने मला याबद्दल सांगितल्यानंतर आम्ही क्रिप्टोमध्ये काहीतरी करण्याचा विचार करीत आहोत. हा प्रयोग कितपत यशस्वी ठरेल ते माहिती नाही. मात्र, आम्हाला ग्राहकांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या आहेत, असे रेस्टॉरंटच्या मालकांकडून सांगण्यात आले.

बिटकॉईन वापरुन ऑनलाईन शॉपिंग करा

बिटकॉईन आणि अन्य क्रिप्टोकरन्सीचा वाढता वापर पाहता अ‍ॅमेझॉन कंपनीकडून आता ग्राहकांना बिटकॉईन किंवा तत्सम क्रिप्टोकरन्सीचा वापर करून व्यवहार करण्याची मुभा देण्यात येणार आहे. अ‍ॅमेझॉनकडून सध्या पेमेंट टीमसाठी डिजिटल करन्सी आणि ब्लॉकचेन एक्सपर्टची भरती केली जात आहे. कंपनीचे यासंबंधीचे धोरण विकसित करण्यासाठी अ‍ॅमेझॉन सध्या या क्षेत्रातील जाणकार नेतृत्वाच्या शोधात आहे. यापूर्वी अ‍ॅपल कंपनीने मे महिन्यात डिजिटल करन्सीचे ज्ञान असलेल्या बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर या पदासाठी भरती सुरु केली होती. या व्यक्तीने डिजिटल वॉलेट, बीएनपीएल, फास्ट पेमेंटस, क्रिप्टोकरन्सी आणि तत्सम पर्याय विकसित करण्यासाठी काम करणे अपेक्षित होते.

याशिवाय, ट्विटर आणि टेस्ला या कंपन्यांनी क्रिप्टोकरन्सी हे भविष्य असल्याचे संकेत दिले आहेत. ऑनलाईन विश्वाला क्रिप्टोकरन्सीसारख्या वैश्विक चलनाची गरज आहे. आमचं लक्ष हे बिटकॉईन असेल. कारण या माध्यमातून जगातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचता येईल, असे ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या:

आता बिटकॉईन वापरुन ऑनलाईन शॉपिंग करा; Amazon कडून लवकरच क्रिप्टोकरन्सीतील व्यवहारांना सुरुवात

क्रिप्टोकरन्सीच्या बाजारपेठेत नोकऱ्यांची अमाप संधी, भारतात 10 हजार तंत्रज्ञांची गरज, 75 लाखांपर्यंतची सॅलरी पॅकेजेस

रिलायन्स, इन्फोसिस, एचडीएफसी बँकेपेक्षा बिटकॉईनचा बाजार मोठा, देशातील या 6 बड्या कंपन्यांवर आहे भारी

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें