आता गॅस कनेक्शन मिळवणे झाले सोपे, केवळ एखादे कागदपत्र दाखवा आणि मिळवा कनेक्शन

स्वयंपाकाच्या गॅस कनेक्शन घेण्याची प्रक्रिया खूप सोपी झाली आहे. कोणीही दुसऱ्या शहरात स्थलांतरीत झाल्यावर सहजपणे सिलिंडर मिळवू शकणार आहे. (Getting a gas connection is now easy, just show a document and get a connection)

आता गॅस कनेक्शन मिळवणे झाले सोपे, केवळ एखादे कागदपत्र दाखवा आणि मिळवा कनेक्शन
Indian Oil Indane Chhotu 5 Kg Cylinder
Follow us
| Updated on: May 12, 2021 | 7:46 PM

नवी दिल्ली : आपण नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने एका शहरातून दुसऱ्या शहरात स्थलांतरीत होत असतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाचे गॅस कनेक्शन मिळवणे मुश्किल बनते. परंतु आता काळजी करण्याचे कारण नाही. कारण आता कुठेही केवळ एक कागदपत्र दाखवून स्वयंपाकाच्या गॅसचे कनेक्शन मिळवता येणार आहे. थोडक्यात काय तर स्वयंपाकाचे गॅस कनेक्शन घेण्याची प्रक्रिया खूप सोपी झाली आहे. कोणीही दुसऱ्या शहरात स्थलांतरीत झाल्यावर सहजपणे सिलिंडर मिळवू शकणार आहे. सध्या कोरोना महामारीमुळे एका शहरातून दुसऱ्या शहरात स्थलांतरणाचे प्रमाण वाढले आहे. लोक शहराकडून गावाकडे स्थलांतरीत होऊ लागले आहेत. स्थलांतरणाच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सरकारने स्वयंपाक गॅस कनेक्शनची प्रक्रिया सोपी बनवली आहे. (Getting a gas connection is now easy, just show a document and get a connection)

केव्हाही मिळवू शकतो कनेक्शन

आता आपण देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात एलपीजी कनेक्शन घेऊ शकता. यासाठी कायमस्वरुपी पत्ता असेलेली कागदपत्र असणे आवश्यक नाही. आता तुम्हाला फक्त एका आयडी पुराव्याच्या आधारे एलपीजी कनेक्शन मिळेल. पेट्रोलियम मंत्रालयाच्या या बदलामुळे आता एलपीजी कनेक्शन घेणे सोपे होईल. एलपीजी कनेक्शनमधील सर्व कागदपत्रांची झंझट राहणार नाही. अलिकडेच हा नियम होता की ज्याच्याकडे अ‍ॅड्रेस प्रूफ आहे तेच एलपीजी ((LPG) सिलिंडर घेऊ शकतात, परंतु देशातील सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने (IOCL)सर्वसामान्यांना दिलासा देत गॅसवरील पत्त्याचे बंधन काढून टाकले आहे. आता तुम्ही कोणत्याही अ‍ॅड्रेस प्रूफशिवाय एलपीजी सिलिंडर घेऊ शकता.

कसे मिळवू शकता कनेक्शन?

आपण आपल्या जवळच्या कोणत्याही एजन्सीमध्ये जाऊन यासाठी अर्ज करू शकता आणि आपण कोणत्याही शहराचा आयडी प्रूफ घेऊ शकता आणि तेथून सहज गॅस कनेक्शन मिळवू शकता. यासाठी ऑनलाईन माध्यमातूनही अर्ज करता येईल. सरकार येत्या दोन वर्षात एक कोटीहून अधिक एलपीजी कनेक्शन देण्याची तयारी करत आहे. पेट्रोलियम सचिव तरुण कपूर म्हणाले की, किमान ओळख कागदपत्र आणि स्थानिक निवासाचा पुरावा नसल्यास कनेक्शन देण्याची योजना तयार आहे. केवळ 2021-22 या आर्थिक वर्षात सरकारने उज्ज्वला योजनेत 1 कोटी नवीन कुटुंबे जोडण्याविषयी सांगितले होते. (Getting a gas connection is now easy, just show a document and get a connection)

लस निर्मिती कंपनी ‘भारत बायोटेक’लाही कोरोनाचा विळखा, कंपनीतील 50 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

शेतकऱ्यांसाठी खुशखबर, 600 मीटर अंतरावरील कृषी पंपांना जोडणीला प्राधान्य देणार, नितीन राऊत यांची घोषणा

Non Stop LIVE Update
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.