लस निर्मिती कंपनी ‘भारत बायोटेक’लाही कोरोनाचा विळखा, कंपनीतील 50 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

भारत बायोटेकमधील 50 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तरीही लस निर्मितीचं काम 24 तास सुरु आहे.

लस निर्मिती कंपनी 'भारत बायोटेक'लाही कोरोनाचा विळखा, कंपनीतील 50 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह
कोव्हॅक्सिन

मुंबई : देशात कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अनेक लसीकरण केंद्रांवर नागरिकांना लस मिळत नाही. याबाबत भारत बायोटेककडून कोव्हॅक्सिन लसीचा पुरवठा कमी होत असल्याच्या विविध राज्यांच्या आरोपावर कंपनीने खुलासा केलाय. कंपनीतील 50 कमर्चाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे, तशी माहिती भारत बायोटेकच्या सहाय्यक व्यवस्थापकीय संचालिका सुचित्रा इल्ला यांनी ट्विटरद्वारे दिलीय. असं असलं तरीही कंपनीत 24 तास लसीचं उत्पादन सुरु असल्याचं त्यांनी सांगितलंय. (Bharat Biotech’s 50 employees corona positive, vaccine production started 24 hours a day)

आम्ही लसीचा पुरवठा सुरुळीत करण्याचा प्रयत्न करत आहोत. असं असतानाही काही राज्य आमच्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत, हे निराशाजनक आहे. आमचे 50 टक्के कर्मचारी कोरोनामुळे कामावर येऊ शकत नाहीत. तरीही आम्ही महामारी आणि लॉकडाऊनमध्ये 24 तास काम करत आहोत, असं ट्वीट सुचित्रा इल्ला यांनी केलंय.

केंद्राकडून मिळालेल्या आदेशानुसार कंपनी 1 मे पासून राज्यांना लसीचा पुरवठा करत आहे. यापूर्वी आरोग्य मंत्रालयाने सांगितलं होतं की, तिसऱ्या टप्प्यात होणारी लसीची एकूण निर्मितीचा 50 टक्के हिस्सा केंद्राला तर उरलेला 50 टक्के हिस्सा राज्य सरकार आणि खुल्या बाजारात विक्रीचे निर्देश देण्यात आले आहेत.

लसीचे ‘राष्ट्रीय धोरण’ जाहीर करा – पटोले

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केंद्रातील मोदी सरकारवर थेट हल्लाबोल केलाय. केंद्रातील मोदी सरकार कोविड परिस्थिती हाताळण्यात पूर्णत: अपयशी ठरले आहे. केंद्र सरकारच्या गलथानपणामुळे लसीकरण मोहीमही फसलीय, असंही नाना पटोले म्हणालेत. देशभरात लसीकरण केंद्राबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. 17 कोटी जनतेला लस दिल्याचे मोदी सरकार सांगते, पण लाखो लोकांची दुसऱ्या डोसची कालमर्यादा उलटून गेली तरी अजून त्यांना दुसरा डोस मिळत नाही. लसीकरणात देशभरात सुसूत्रता दिसत नाही म्हणून केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीचे राष्ट्रीय धोरण जाहीर करावे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.

संबंधित बातम्या : 

Wardha Lockdown | वर्ध्यात खबरदारी म्हणून लॉकडाऊनमध्ये वाढ, आणखी 5 दिवस निर्बंध कायम

राज्यातील लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढणार? राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णयाची शक्यता

Bharat Biotech’s 50 employees corona positive, vaccine production started 24 hours a day