अदानी फाऊंडेशन आणि दत्ता मेघे अभिमत विद्यापीठ यांच्या सहयोगाने ग्लोबल सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना
ही भागीदार अदानी समुहाचे चेअरमन गौतम अदानी यांचा विचार "सेवा ही साधना है" ने प्रेरित आहे. आणि दर्जेदार आरोग्य सेवा आणि शिक्षणाची उपलब्धता हा राष्ट्र उभारणीचा पाया आहे या विश्वासाचे प्रतिबिंबित करत असे यावेळी उभयतांनी यावेळी म्हटले आहे.

अदानी समूहाची CSR शाखा अदानी फाऊंडेशनने महाराष्ट्रातील अभिमत विद्यापीठ दत्ता मेघे इंस्टिट्यूट ऑफ हायर एजुकेशन एण्ड रिसर्च (DMIHER) सोबत एकत्र येत आरोग्य शिक्षण आणि सेवा वितरण क्षेत्रात ग्लोबल सेंटर ऑफ एक्सलन्सची (Centre of Excellence) स्थापना अहमदाबाद येथे केली आहे. त्याद्वारे परवडणारे आरोग्यसेवा शिक्षण आणि वितरण यंत्रणा उभारण्यात येणार आहे.
समावेशक विकासासाठी सामायिक दृष्टीकोन
अदानी फाउंडेशन आणि डीएमआयएचईआर ( DMIHER ) यांच्यातील ही भागीदारी म्हणजे सुलभ, परवडणारे आणि उच्च दर्जाचे आरोग्य शिक्षण देणारे मॉडेल तयार करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. सेवा, संधी आणि करुणेद्वारे समुदाय सक्षमीकरणाला चालना देण्याच्या फाऊंडेशनच्या उद्दिष्टाचे ते प्रतिनिधीत्व करीत आहे.
‘विकसित भारत २०४७’ च्या ध्येयात योगदान द्यावे
दर्जेदार आरोग्यसेवा आणि शिक्षण हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे, विशेषाधिकार नाही आणि DMIHER सोबतची ही भागीदारी आमचा असा विश्वास प्रतिबिंबित करीत आहे असे अदानी फाऊंडेशनचे अध्यक्षा डॉ. प्रीती अदानी यांनी म्हटले आहे. या केंद्राच्या निर्मितीमध्ये सहभागी होण्याचा आम्हाला अभिमान आहे, ज्यामुळे शैक्षणिक नवोपक्रम, क्लिनिकल संशोधन आणि सामुदायिक जबाबदारी एकत्रित करेल. आमचे ध्येय हे आहे की या केंद्राने सन्मानाने सेवा प्रदान करावी आणि ‘विकसित भारत २०४७’ च्या ध्येयात अर्थपूर्ण योगदान द्यावे.
ऐतिहासिक भागीदारीबद्दल अभिमान वाटतो
“या ऐतिहासिक भागीदारीबद्दल मला खूप अभिमान वाटतो. गेल्या ३५ वर्षांपासून आपण ज्या स्वावलंबी आरोग्य आणि शिक्षण परिसंस्थेची कल्पना केली होती ती आज प्रत्यक्षात येत आहे. अदानी फाउंडेशनसोबतची ही भागीदारी प्रादेशिक आणि राष्ट्रीय विकासाला नवीन दिशा देईल आणि ‘विकसित भारत २०४७’ च्या दिशेने आमचा सामायिक संकल्प अधोरेखीत करेल.”असे DMIHER चे संस्थापक दत्ता मेघे यांनी म्हटले आहे.
