Gold Silver Price Today : सोन्याने घेतली फिरकी! भावात उसळी, चांदी पण महागली

Gold Silver Price Today : सोन-चांदीचा भाव वधारला आहे. सोन्याने पुन्हा गिरकी घेत ग्राहकांची फिरकी घेतली. गेल्या आठवड्यात भावात पडझड झाल्यानंतर भाव वधारले आहेत. चांदीने पण गेल्या आठवड्यातील कसर भरुन काढण्याचा प्रयत्न केला आहे.

Gold Silver Price Today : सोन्याने घेतली फिरकी! भावात उसळी, चांदी पण महागली
सोने-चांदीचा भाव काय
Follow us
| Updated on: May 16, 2023 | 9:12 AM

नवी दिल्ली : जागतिक बाजारात अमेरिकेतील घडामोडींचा मोठा परिणाम सोने-चांदी (Gold Silver Price), कच्चा इंधनाच्या किंमतींवरुन दिसून येत आहे. सोने-चांदीचा भाव वधारला आहे. सोन्याने पुन्हा गिरकी घेत ग्राहकांची फिरकी घेतली. गेल्या आठवड्यात भावात पडझड झाल्यानंतर भाव वधारले आहेत. चांदीने पण गेल्या आठवड्यातील कसर भरुन काढण्याचा प्रयत्न केला आहे. शनिवार-रविवारी सुट्टी असल्याने इंडियन बुलियन आणि ज्वेलर्स असोसिएशनने भाव जाहीर केले नव्हते. पण बाजारात सोन्याने दरवाढीची वर्दी दिली होती. तर चांदीत घसरण कायम होती. सोमवारपासून घसरणीच्या सत्राला ब्रेक लागला.

काय होता भाव गुडरिटर्न्सनुसार, सोमवारी 15 मे रोजी सोन्याच्या भावात मोठा बदल झाला नाही. 22 कॅरेटचा भाव 56,800 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,940 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आज हा भाव अनुक्रमे 56,790 रुपये आणि 61,940 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आज ibjarates सकाळच्या सत्रातील भाव जाहीर केलेला नाही. काल 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,208 रुपये तर 22 कॅरेट 10 ग्रॅम सोने 56,067 रुपये होते.

24, 23, 22 कॅरेटचा भाव ibjarates.com नुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,208 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 23 कॅरेटचा भाव 60,963 रुपये तर 22 कॅरेटचा भाव 56,067 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 18 कॅरेट सोन्याचा भाव 45,906 रुपये होता. हे भाव काल संध्याकाळचे आहेत.

हे सुद्धा वाचा

चांदीचा दरवाढीचा गिअर पडणार 1 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 76,000 रुपये होता. तर 6 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 78,250 रुपये आहे. म्हणजे पाच दिवसांत चांदी किलोमागे 2250 रुपयांची वाढ झाली. 9 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 78,100 रुपये होता. 10 मे रोजी सकाळच्या सत्रात चांदी किलोमागे 100 रुपयांची घसरण होऊन भाव 78,000 रुपये झाला आहे. मंगळवारी 16 मे रोजी सकाळच्या सत्रात भावात मोठ दिसला नाही. एक किलो भाव 74,800 रुपये आहे. तर ibjarates.com नुसार, एक किलो चांदीचा 72,455 रुपये भाव आहे.

भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

शुद्ध सोन्याचा हॉलमार्क भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.

काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.