Weekly Gold Price | सोन्याने ओलांडला 52 हजारांचा टप्पा, या आठवड्यात सोन्यात चमक, इतके वाढले भाव?

Weekly Gold Price | या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली होती, मात्र गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात वृद्धी झाली. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) मते, 5 ऑगस्ट रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव सर्वाधिक 52,140 रुपये होता. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 51,931 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता.

Weekly Gold Price | सोन्याने ओलांडला 52 हजारांचा टप्पा, या आठवड्यात सोन्यात चमक, इतके वाढले भाव?
सोने चमकले
Image Credit source: सोशल मीडिया
कल्याण माणिकराव देशमुख

|

Aug 06, 2022 | 12:43 PM

Weekly Gold Price | सोन्याच्या दरात (Gold Rate) सातत्याने चढउतार होतो. सोन्याचे दर मध्यंतरी घसरल्यानंतर सलग तिसऱ्या आठवड्यात सोन्याच्या दरात वाढ झाली. या आठवड्यात सोन्याचा दर 52 हजारांच्या पुढे गेला. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी (Week Last Date) पुन्हा एकदा सोन्याच्या दराने उसळी घेतली आणि सोन्याच्या दरात वाढ झाली. सराफा बाजारात (Sarafa Bazar) आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (5 ऑगस्ट) सोने 52,140 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी हा दर 51,623 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. म्हणजे गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात सोन्याच्या दरात 517 रुपयांचा फरक पडला. सोने 517 रुपयांनी वधरले.सोन्यावरील जीएसटी शुल्क वेगळे भरावे लागते. सोन्याचा दागिना खरेदी केल्यावर ग्राहकाला शुल्क ही द्यावे लागते, त्यामुळे किंमती जास्त मोजावी लागते. डॉलरपेक्षा रुपया 17 पैशांनी वधरला. अमेरिकन मध्यवर्ती बँकेने (American Federal Reserve) व्याजदरात वाढ केलेली आहे तर भारतीय रिझर्व्ह बँकेने ही 5 ऑगस्ट रोजी रेपो दरात वाढ केली आहे. त्याचा परिणाम आता अर्थव्यवस्थेवर दिसून येईल.

या आठवड्यात सोन्याचे दर

या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली होती, मात्र आठवड्याच्या शेवटच्या दोन दिवसांत हे दर झपाट्याने वाढले आहेत. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) मते, सोमवारी (1 ऑगस्ट) सोनं 51,405 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झालं होतं. मंगळवारी सोन्याच्या दरात वाढ झाली आणि त्यानंतर वाढ कायम राहिली.

या आठवड्यात भावातील बदल

बुधवारी सोन्याचा दर 51,486 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. गुरुवारी तो 51,815 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. शुक्रवारी सोन्याच्या किंमत 52 हजारांच्या पुढे गेली आणि 51,140 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाली.

24 कॅरेट सोन्याचा भाव

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) मते, 5 ऑगस्ट रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव सर्वाधिक 52,140 रुपये होता. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 51,931 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. सर्व प्रकारच्या सोन्याचा दर कर न लावता मोजण्यात आला आहे. सोन्यावरील जीएसटी शुल्क वेगळे भरावे लागते. सोन्याचा दागिना खरेदी केल्यावर ग्राहकाला शुल्क ही द्यावे लागते, त्यामुळे किंमती जास्त मोजावी लागते.

हे सुद्धा वाचा

आयबीजेए सरकारी सुट्ट्यांसह शनिवारी आणि रविवारी दर जाहीर करत नाही. आठवड्याच्या शेवटी तुम्ही 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याचे दर तुम्हाला मोबाईलवर ही मिळतील. यासाठी तुम्हाला 8955664433 मिस्ड कॉल द्यावा लागेल आणि सोन्याच्या दराची माहिती एसएमएसद्वारे तुम्हाला प्राप्त होईल.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें