Gold Monetisation Scheme: आता घरी पडून असलेल्या सोन्यातून कमाईची संधी, जाणून घ्या मोदी सरकारची योजना

सरकारनं घरी आणि मंदिरांमध्ये असलेल्या सोन्याचा फायदा करून देण्यासाठी गोल्ड मॉनेटायझेशन योजना आणलीय. या योजनेंतर्गत सोने बँकेत जमा करून तुम्ही फायदा कमावू शकता. बँकेत ठेवलेल्या सोन्यावर वार्षिक 2.25 ते 2.50 टक्क्यांपर्यंत वार्षिक व्याज मिळते.

Gold Monetisation Scheme: आता घरी पडून असलेल्या सोन्यातून कमाईची संधी, जाणून घ्या मोदी सरकारची योजना
Gold Rate Today

नवी दिल्लीः सोन्यात गुंतवणूक करणे ही भारतीयांच्या पसंतीची गोष्ट आहे. प्रत्येकाच्या घरात काही ना काही सोन्याचे दागिने असतातच. एका अहवालानुसार, भारतात घर आणि ट्रस्टमध्ये जवळपास 24 ते 25 हजार टन सोने पडून आहे. लोकांच्या घरात वर्षानुवर्षे सोने पडून असते, पण ते त्याचा वापर करत नाहीत. लोक ते पाहूनच खूश होतात. त्यामुळेच सरकारनं घरी आणि मंदिरांमध्ये असलेल्या सोन्याचा फायदा करून देण्यासाठी गोल्ड मॉनेटायझेशन योजना आणलीय. या योजनेंतर्गत सोने बँकेत जमा करून तुम्ही फायदा कमावू शकता. बँकेत ठेवलेल्या सोन्यावर वार्षिक 2.25 ते 2.50 टक्क्यांपर्यंत वार्षिक व्याज मिळते.

गोल्ड मॉनिटायझेशन योजना काय आहे?

गोल्ड मॉनिटायझेशन योजना ही मोदी सरकारने 2015 मध्ये आणली होती. ही योजना म्हणजे 1999 मधील योजनेचा सुधारित भाग आहे. या अंतर्गत घरगुती सोन्यापासून विविध संस्थांचं सोनं बँकेत ठेवून त्यावर मुदतीनुसार व्याज देणे. जसे बँकेत पैसे ठेवल्यावर व्याज मिळतात, तसं घरात असलेलं सोनं बँकेत ठेवून त्यावर व्याज मिळते. केंद्र सरकारची ही योजना आहे.

घरी ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर पैसे कसे कमवायचे?

जर तुम्ही तुमचे सोन्याचे दागिने बँकेत ठेवायचे ठरवले तर तुम्हाला लॉकरचे शुल्क भरावे लागेल. तुमच्या घरी ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांमधून तुम्ही अधिक पैसे कमावू शकता, असा एक मार्ग आहे. तुम्ही निष्क्रिय सोने RBI ने नियुक्त केलेल्या बँकेत जमा करू शकता आणि त्यावर व्याज मिळवू शकता. आरबीआयच्या गोल्ड मॉनेटायझेशन योजनेअंतर्गत (Gold Monetisation Scheme) ही सुविधा उपलब्ध आहे. हे बँकेच्या मुदत ठेवीसारखे आहे, जिथे तुम्ही तुमचे घरी पडून असलेले सोने बँकेत जमा करता येते आणि मॅच्युरिटी झाल्यावर तुम्हाला सोने किंवा सोन्याचे मूल्य जमा व्याजासह परत मिळते.

‘या’ बँका सेवा देताहेत

अलीकडे एचडीएफसी बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) यासह अनेक बँका ट्विटरवर आरबीआयच्या गोल्ड मॉनेटायझेशन योजनेचा प्रचार करताना दिसत आहेत. एचडीएफसी बँकेने आपल्या ट्विटरवर लिहिले, “तुमच्याकडे असलेल्या निष्क्रिय सोन्याच्या दागिन्यांवर व्याज मिळवू शकता. एचडीएफसी बँक तुमच्या निष्क्रिय सोन्यावर (idle lying gold jewellery) जास्त व्याज देते. एचडीएफसी बँक गोल्ड मॉनेटायझेशन योजनेमध्ये गुंतवणूक करा, दीर्घ मुदतीच्या ठेवींवर 2.50% आणि मध्यम मुदत ठेवींवर 2.25% मिळवा. या योजनेंतर्गत सोन्याची किंमत मॅच्युरिटीच्या वेळी सध्याच्या किमतीवर आधारित असेल. सोन्याच्या ठेव मूल्यावर व्याज मोजले जाणार आहे.

गोल्ड मॉनिटायझेशन योजना काय आहे ते जाणून घ्या?

ही योजना फिक्स डिपॉझिटच्या स्वरूपात सोन्यातही जमा करता येते. भारतातील रहिवासी असलेली कोणतीही व्यक्ती या योजनेत गुंतवणूक करू शकते. गोल्ड एफडी संयुक्त नावानेही उघडता येते. बँका या योजनेंतर्गत सोन्याचे बार, नाणी, रत्ने आणि इतर धातू वगळता दागिन्यांच्या स्वरूपात कच्चे सोने स्वीकारतात. गुंतवणूकदार किमान 10 ग्रॅम कच्चे सोने जमा करू शकतो. गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. गुंतवणूकदार 1 ते 15 वर्षांच्या दरम्यान कोणतीही मुदत निवडू शकतात.

मुदतीचे विविध पर्याय

<< शॉर्ट टर्म बँक डिपॉझिट (STBD): कार्यकाळ 1 ते 3 वर्षे
<< मध्यम मुदतीची सरकारी ठेव (MTGD): कार्यकाल: 5-7 वर्षे
<< दीर्घकालीन सरकारी ठेवी (LTGD) कालावधी 12-15 वर्षे

मॅच्युरिटीच्या वेळी ठेवीदाराला ज्या स्वरूपात त्याने सोने जमा केले होते त्याच स्वरूपात ते मिळत नाही. जमा केलेले सोन्याचे दागिने वितळले जातात आणि पीव्हीसीद्वारे चाचणी केली जाते.

संबंधित बातम्या

Gold Rate Today: सोने आणि चांदी पुन्हा एकदा स्वस्त, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचे भाव

नोकरीत पगाराच्या स्लिपचे काय महत्त्व, जाणून घ्या कामाच्या 10 गोष्टी

Gold Monetization Scheme: Now the opportunity to earn from the gold lying at home, know the Modi government’s plan

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI