काय सांगता, सोने आणखी चकाकणार? अमेरिकेच्या खेळीने सोन्याचा भाव गगनाला? काय आहे G7 देशांचा प्लॅन

आता सोन्याचे भाव गगनाला भिडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या भीती मागची कारणे काय आहेत? अमेरिकेची कोणती खेळी सोन्याला झळाळी आणणार? याविषयी जाणून घेऊयात.

काय सांगता, सोने आणखी चकाकणार? अमेरिकेच्या खेळीने सोन्याचा भाव गगनाला? काय आहे  G7 देशांचा प्लॅन
सोन्याचे दर वधरले
Image Credit source: सोशल मीडिया
कल्याण माणिकराव देशमुख

|

Jun 26, 2022 | 4:24 PM

रशिया-युक्रेनमधील (Russia-Ukraine war) तणावात अनेक देश भरडल्या जात आहेत. कच्च्या तेलाच्या किंमती भडकल्याने अनेक अर्थव्यवस्थांचं (World Economy) कंबरडं मोडलं आहे. या अर्थव्यवस्था देशोधडीला लागल्या आहेत. आपल्या शेजारील श्रीलंकेचे (Sri lanka) ताजे उदाहरण आपल्यासमोर आहे. त्यातच आता अमेरिकेच्या (United State of America) एका खेळीने सोन्याचे भाव (Gold Price) ही गगनाला जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. जी 7 देशाने (G 7) घेतलेल्या या निर्णयामुळे सोन्याला चकाकी येणार आहे. अमेरिकेने रशियाच्या सोन्यावर प्रतिबंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सोन्याच्या किंमती भडकण्याची भीती जागतिक समुदाय व्यक्त करत आहे. युक्रेन वर रशियाने केलेल्या हल्ल्याच्या विरोधात अमेरिका रशियावर विविध मार्गाने दबाव तयार करत आहे. अमेरिका आणि मित्र राष्ट्रांनी अगोदरच अनेक निर्बंध (Ban) रशियावर लादले आहेत. त्यात कच्चे तेल आणि गॅसवर प्रतिबंध लावण्यात आला आहे. त्याचे दुष्परिणाम ही जग भोगत आहे. आता अमेरिका रशियातून निर्यात होणा-या सोन्यावर ही बंदीची मोहर लावण्याची घोषणा करणार आहे.

बायडेन यांचं मोठं वक्तव्य

अमेरिकेचे राष्ट्रपती जो बाईडेन यांनी रविवारी याविषयीचा विचार बोलून दाखविला. जी 7 देशांशी चर्चा करुन अहवालानंतर रशियावर निर्बंध लागू करण्याविषयी लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जी 7 मध्ये जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांचा समावेश आहे. अमेरिका आणि जी 7 देशांनी रशियातून सोने आयात करणा-यावर प्रतिबंध घातल्यावर सोन्याचा तुटवडा जाणवेल आणि सोन्याचे दर भडकतील. मंगळवारी जी 7 देशांची बैठक होत आहे. या बैठकीत रशियाच्या सोने निर्यातीवर बंदी घालण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

रशियावर निर्बंधाचे अस्त्र

युक्रेनवरील हल्ल्याविरोधात रशियावर निर्बंध लादण्यात आले आहे. पण त्याचा उलट परिणाम जगभरातील अनेक देशांवर दिसत आहे. आपल्या देशातही इंधनाच्या किंमती त्यामुळे भडकल्या आहेत. कच्चे तेल आणि नैसर्गिक वायुचे दर वाढले आहेत. जी 7 देशांच्या मंगळवारी होणा-या बैठकीत इंधनाचे दर घटवण्यासाठी चर्चा होईल. रशियाकडून होणा-या निर्यातीत कच्च्या तेलानंतर सोन्याची निर्यात दुस-या स्थानी आहे. रशियाला जेरीस आणण्यासाठी आता सोन्याच्या निर्यातीवर बंदी आणण्यात येणार आहे. ब्रिटेन, अमेरिका, जपान आणि कॅनडा हे देश लवकरच सोने निर्यातीवर बंदी घालतील. रुस मधील सोन्याच्या खाणीत उत्पादित होणारे सोने हे देश खरेदी करणार नाहीत. गेल्यावर्षी रशियाने 12.6 अब्ज पाऊंड सोन्याची निर्यात केली होती. वास्तविक बंदी लादण्यापूर्वीचे सर्व सोन्याचे व्यवहार रशियाला पूर्ण करता येणार आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें