Today Gold Rate : सोने सूसाट धावणार? ग्राहकाने खरेदीची करावी लगबग की पहावी वाट?

Today Gold Rate : सोने आणि चांदीवर गेल्या आठवड्यात दबाव दिसून आला. चांदीच्या किंमती 6,500 रुपयांनी घसरल्या. तर सोन्याचा भाव 2,300 रुपये प्रति 10 ग्रॅमने कमी झाला. मग आता सोन्यातील गुंतवणूक फायद्याची ठरेल का?

Today Gold Rate : सोने सूसाट धावणार? ग्राहकाने खरेदीची करावी लगबग की पहावी वाट?
खरेदी करावी का?
Follow us
| Updated on: Feb 11, 2023 | 9:34 AM

नवी दिल्ली : सोन्याने गेल्या आठवड्यात उच्चांक गाठला होता. सोन्याची किंमत (Gold Price Today) 58,847 रुपयांवर पोहचले होते. सध्याच्या किंमतीपेक्षा हा भाव 2,300 रुपये प्रति 10 ग्रॅम जास्त होता. अमेरिकन केंद्रीय बँक, फेडरल रिझर्व्हच्या धोरणामुळे डॉलर निर्देशांक सावरला. तर अमेरिकन केंद्रीय बँकेच्या तिजोरीत गंगाजळी आल्याने सोन्याच्या किंमती विक्रमी उच्चांकावरुन खाली घसरल्या आहेत. सोने आणि चांदीवर गेल्या आठवड्यात दबाव दिसून आला. चांदीच्या किंमती (Silver Price Today) 6,500 रुपयांनी घसरल्या. ही युरोपियन मध्यवर्ती बँकांनी सोने विक्री थांबवली आहे. तर रशिया, तुर्की आणि भारतीय केंद्रीय बँकांनी खरेदीवर मंथन सुरु केले आहे. सोने-चांदीच्या घसरणीचा गुंतवणूकदारांना मोठा फायदा होईल,असा तज्ज्ञांचा दावा आहे.

वायदे बाजारात, एप्रिल 2023 साठी सोन्याचा भाव 56,780 रुपये 10 ग्रॅम स्तरावर आहे. हा भाव सोन्याच्या उच्चांकी स्तरापासून अर्थात 2000 रुपयांनी कमी आहे. तज्ज्ञांच्या मते, सोने 57,000, 57,100 रुपयांवर उसळी घेऊ शकते. तर 56,350 रुपयांवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

इंडियन बुलियन आणि ज्वैलर्स असोसिएशन(India Bullion And Jewellers Association-IBJA ) नुसार, काल सराफा बाजारात शुद्ध सोन्याचा भाव 57,538 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर चांदीचा भाव 67,516 रुपये प्रति किलो होता. तर गुडरिटर्न्सनुसार, शनिवारी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 57,310 रुपये आहे. सोन्यात 550 रुपयांची घसरण झाली आहे. तर 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 52,450 रुपये आहे. काल हा भाव 53,050 रुपये होता.

हे सुद्धा वाचा

सोन्याच्या किंमती तुम्ही घरात बसूनही चेक करु शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन तुम्हाला भाव चेक करता येईल. ज्या मोबाईल क्रमांकावरुन तुम्ही मॅसेज पाठवाल त्यावर किंमतींचा संदेश येईल.

भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.

काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.