AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today: दिवाळीपूर्वीच सोन्याची भाववाढ, चांदीही महाग, पटापट तपासा

दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 256 रुपयांनी वाढले. यासह राष्ट्रीय राजधानीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याची किंमत 46,580 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाली. सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी अजूनही आहे, कारण त्याची सध्याची किंमत विक्रमी उच्चांकापेक्षा कमी आहे.

Gold Price Today: दिवाळीपूर्वीच सोन्याची भाववाढ, चांदीही महाग, पटापट तपासा
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Oct 19, 2021 | 5:21 PM
Share

नवी दिल्ली : दिवाळीपूर्वी मागणी वाढल्याने सोन्याच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. सणासुदीच्या काळात भारतीय सराफा बाजारात आज म्हणजेच 19 ऑक्टोबर 2021 रोजी सोन्याच्या किमतीत वाढ झाली. त्याचबरोबर आज चांदीच्या दरातही वाढ झाली. गेल्या सराफा सत्रादरम्यान दिल्ली सराफा बाजारात सोने प्रति 10 ग्रॅम 46,324 रुपयांवर बंद झाले होते. त्याचबरोबर चांदी 62,140 रुपये प्रति किलोवर बंद झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोन्याचे भाव वाढले, तर चांदीच्या किमतीत थोडासा बदल झाला.

सोन्याचे नवे भाव

दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 256 रुपयांनी वाढले. यासह राष्ट्रीय राजधानीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याची किंमत 46,580 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाली. सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी अजूनही आहे, कारण त्याची सध्याची किंमत विक्रमी उच्चांकापेक्षा कमी आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोनं 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या किमतीत उसळी नोंदली गेली आणि ती 1,782 डॉलर प्रति औंसवर पोहोचली.

चांदीची नवी किंमत

आज चांदीच्या किमतीत वाढ झाली. दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी चांदीचे भाव केवळ 188 रुपयांनी वाढून 62,328 रुपये प्रति किलोवर बंद झाले. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या किमतीत कोणतेही महत्त्वपूर्ण बदल झाले नाहीत आणि ते 23.72 डॉलर प्रति औंसवर पोहोचले.

सोने का वाढले?

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की, मजबूत डॉलर आणि जागतिक बाजारातील संकेतांमुळे सोन्याचे भाव जास्त किमतीवर आहेत. कॉमेक्सवर सोन्याच्या किमतीत 1 टक्के वाढ झाली.

सोन्याची किंमत 57 हजार रुपयांपासून 60 हजार रुपयांपर्यंत जाणार

दिवाळी ते डिसेंबरपर्यंत सोन्याची किंमत 57 हजार रुपयांपासून 60 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. म्हणजेच आता जे भाव चालू आहेत ते 14 हजार प्रति 10 ग्रॅमपर्यंत वाढू शकतात. जोपर्यंत चांदीचा प्रश्न आहे, त्यातही मोठी वाढ होऊ शकते. बहुतेक व्यापाऱ्यांचा असा विश्वास आहे की, दिवाळीपर्यंत किंवा वर्षाच्या अखेरीपर्यंत चांदीचे दर 76,000 ते 82,000 रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकतात.

भारतात गोल्ड एक्सचेंज उभारणार

बाजार नियामक सेबीने बुधवारी गोल्ड एक्सचेंज उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. गोल्ड एक्सचेंजमध्ये सोन्याचा व्यापार इलेक्ट्रॉनिक गोल्ड रसीद (पावती) अर्थात ईजीआरद्वारे केला जाईल. इलेक्ट्रॉनिक गोल्ड रसीद (EGR) कोणत्याही मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज किंवा नवीन स्टॉक एक्सचेंजमधून सुरू केली जाईल. सेबीच्या मंजुरीनंतरच हे ठरवले जाईल की, ईजीआरची किमान किंमत किती असेल. यानंतर शेअर बाजार EGR चे सोन्यात रूपांतर करू शकतील. सेबीच्या मते, गोल्ड एक्स्चेंजमध्ये EGR च्या ट्रेडिंग आणि फिजिकल सोन्याच्या डिलिव्हरीसाठी संपूर्ण इको-सिस्टम असेल आणि देशातील सोन्याच्या व्यवहारात अधिक पारदर्शकता आणि निवड प्रदान करेल. ईजीआरच्या खरेदी आणि विक्रीसाठी गोल्ड एक्सचेंज हे राष्ट्रीय व्यासपीठ असेल. ईजीआरअंतर्गत मानक सोन्याचा व्यापार केला जाईल आणि देशभरात सोन्याची एकसमान किंमत रचना तयार करण्यात मदत होईल.

संबंधित बातम्या

75 हजारांचा Samsung 5G स्मार्टफोन अवघ्या 38 हजारात, कुठे मिळतेय शानदार ऑफर?

SBI ची सेवा आता ‘या’ 15 भाषेत; कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी सावधान, अन्यथा मोठे नुकसान

फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.