Gold Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोनं झालं आणखी स्वस्त, वाचा आजचे दर

जागतिक पातळीवर, डॉलरमधील रिकव्हरी आणि अमेरिकन मदत पॅकेजच्या अनिश्चिततेमुळे जागतिक पातळीवर सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत.

Gold Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोनं झालं आणखी स्वस्त, वाचा आजचे दर

Gold Silver Price: गेल्या काही दिवसांपासून सतत सोन्य़ाचे भाव घसरताना दिसत आहे. अशात आजही सोन्याच्या भावांमध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. सोमवारी बाजार उघडताच सोनं वधारलं पण लगेचच त्याचे भाव घसरले. सोमवारी सोनं 50,687 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झालं तर आज यामध्येही 87 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे आज घरेलू बाजारात 50,600 रुपये असा सोन्याचा भाव सुरू झाला. (Gold Price Today price fall on 20th october know the todays rate here)

यामध्ये सोनं आणखी घसरून आता 50,525 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आलं आहे. तर चांदीचे भावही घसरले आहे. चांदी 80,000 रुपये प्रति किलोग्रॅम होती. आज बाजार उघडताच चांदीचा वायदा भाव 61,250 रुपयांवर आला आहे. त्यामुळे चांदीच्या किमतींमध्ये 18,118 रुपये प्रति किलोग्रॅम घसरण झाली आहे.

तुमच्याकडे आहे ही 10 रुपयांची नोट तर लगेच मिळतील 25 हजार, वाचा कसे?

का घसरले सोन्याचे भाव?
जागतिक पातळीवर, डॉलरमधील रिकव्हरी आणि अमेरिकन मदत पॅकेजच्या अनिश्चिततेमुळे जागतिक पातळीवर सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. जागतिक बाजारात सोन्याचे दर प्रति औंस 0.1% घसरून ते 1,898.16 डॉलरवर बंद झाले. इतर मौल्यवान धातूंपैकी चांदी 0.3 टक्क्यांनी घसरून 24.43 डॉलर प्रति औंस आली आहे. प्लॅटिनम आणि पॅलेडियम 0.1% वाढून 857.85 डॉलर प्रति डॉलरवर पोहोचलं आहे.

अमेरिकेत पुढच्या महिन्यात होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकांआधी काही अनुदानपर घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. जेव्हा अर्थव्यवस्था कमकुवत होते तेव्हा सोन्याचे भाव वाढतात आणि जेव्हा अर्थव्यवस्था चांगली असते तेव्हा सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण होते.

‘या’ तारखेपर्यंत राज्यावर अस्मानी संकट, आज 8 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

दिवाळीपर्यंत वाढतील सोन्याच्या किंमती
येणाऱ्या काही दिवसांमध्ये किंमती आणखी घसरू शकतात. पण दिवाळीपर्यंत सोन्याच्या किंमती मोठ्या झपाट्याने वाढतील. दिवाळीपर्यंत सोनं 50000-52000 रुपये प्रति 10 ग्रॅम होण्याची शक्यता आहे.

(Gold Price Today price fall on 20th october know the todays rate here)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *