AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate Today : रेकॉर्ड स्तरावर 9,000 रुपयांनी स्वस्त झालं, वाचा आजचे ताजे भाव

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा वायदा भाव किंमती 0.13 टक्क्यांनी घसरला आहे.

Gold Rate Today : रेकॉर्ड स्तरावर 9,000 रुपयांनी स्वस्त झालं, वाचा आजचे ताजे भाव
| Edited By: | Updated on: Feb 08, 2021 | 11:57 AM
Share

नवी दिल्ली : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आज भारतीय बाजारपेठेतील सोन्या-चांदीच्या किंमती (Gold/Silver Rate Today) घसरल्याचं समोर आलं आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा वायदा भाव किंमती 0.13 टक्क्यांनी घसरला आहे. ही 6 सत्रात पाचवी घसरण असल्याची माहिती देण्यात आली आहे. इतकंच नाहीतर चांदीच्या किंमतीतही 0.2 टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. (gold rate today silver rates on 8 february in mumbai and delhi here is todays gold price)

मागच्या सत्रात सोन्याचे दर 1.2 टक्क्यांनी तर चांदी 2.8 टक्क्यांनी वधारली होती. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये 56,200 च्या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचलं होतं. त्यानंतर यंदाच्या वर्षात सोन्याच्या किंमती खूपच अस्थिर असल्याचं पाहायला मिळतं. आता सोन्याच्या किंमती विक्रमी उच्चांकडून 9,000 रुपयांनी घसरल्या आहेत.

सोने-चांदीचे आजचे दर (Gold and Silver Rates on 8 February 2021)

सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर फेब्रुवारीमधील सोन्याचा वायदा भाव 0.13 टक्क्यांनी घसरून 47,195 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे तर एक किलो चांदीची किंमत 0.28 टक्क्यांनी घसरून 68,593 रुपये झाली.

…म्हणून सोने स्वस्त होऊ लागले

2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोने आणि चांदीवरील सीमा शुल्क 7.5 टक्क्यांवर आणण्याचा प्रस्ताव दिला. सध्या ते 12.5 टक्के आहे. यापूर्वी जुलै 2019 मध्ये शुल्कात 10 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली होती. त्यानंतर त्यांचे दर झपाट्याने वाढले होते.

सोनं स्वस्त का होतंय?

आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकन डॉलरची किंमत वाढत चालली आहे. म्हणूनच सोन्याचे दर सतत घसरत आहेत. परदेशी बाजारात सोन्याची किंमत प्रति औंस 1800 डॉलरवर आली आहे. नोव्हेंबर 2020 नंतर हे घडले आहे. चांदीच्या किमतींमध्ये अजूनही चढउतार कायम आहे. यामागील औद्योगिक मागणीत तेजी आहे. कमोडिटी मार्केटमधील काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर जगातील आर्थिक घडामोडी अशाच प्रकारे चालू राहिल्या, तर येत्या काही दिवसांत सोन्याच्या किमतीत आणखी घसरण येऊ शकते.

सोने आणखी स्वस्त होऊ शकते

शुक्रवारी पतधोरण समितीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत रिझर्व्ह बँकेने असे सूचित केले आहे की, बँकांना सीआरआर पातळी आधीच्या कोरोना व्हायरसपर्यंत घ्यावी लागेल. त्यानंतर व्याजदरात वाढ होण्याची चिन्हे देखील आहेत, यामुळे सोन्याच्या किमतींवर दबाव वाढणार आहे. तज्ज्ञांचे मत आहे की, सोन्याच्या किमती सध्याच्या पातळीवरून 4600 रुपयांवरून प्रति दहा ग्रॅमपर्यंत घसरून 42000 रुपयांवर येऊ शकतात.

सोन्याचे दागिने खरेदी करताना या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

बर्‍याचदा आपण असे दागिने खरेदी करतो ज्यात खडे असतात. काही ज्वेलर्स संपूर्ण खड्यांचे वजन करतात आणि सोन्याच्या किमतीसह एकत्र करतात. म्हणजेच सोन्याच्या किमतीइतकेच त्यांची किंमत आहे. सोने मोडताना किंवा परत विकताना खड्यांचे वजन आणि अशुद्धता सोन्याचं एकूण मूल्य वजा केले जाते.

सोन्याचे दागिने वेगवेगळ्या कॅरेटमध्ये येतात. कॅरेट सोन्याच्या शुद्धतेचे मापन आहे. सर्वात शुद्ध सोने हे 24 कॅरेटचे आहे. दागिने सहसा 22 कॅरेटमध्ये बनवतात. यात 91.6 टक्के सोने असते. मेकिंग चार्ज हा आपल्या डिझाईनचे दागिने खरेदी करण्यावर अवलंबून असतो. यामागील मुख्य कारण म्हणजे प्रत्येक दागदागिने कटिंग आणि फिनिशिंगसाठी वेगवेगळी शैली वापरतात. बीआयएस मानक हॉलमार्क सोन्याचे दागिने प्रमाणित करण्यासाठी हॉलमार्किंग केले जाते. हे भारतीय मानक ब्यूरोने (बीआयएस) केले आहे. दागदागिने खरेदी करताना हे पाहिलेच पाहिजे. (gold rate today silver rates on 8 february in mumbai and delhi here is todays gold price)

संबंधित बातम्या – 

SBI ग्राहकांसाठी अलर्ट! आताच अपडेट करा ही माहिती नाहीतर ATM होईल बंद

जन धन खाते असल्यास 31 मार्चपर्यंत करा हे काम, अन्यथा लाखोंचं नुकसान

LPG Gas कनेक्शन घेतल्यावर सरकार देणार 1600 रुपये, तुम्हीही घेऊ शकता संधीचा लाभ

Petrol Diesel Price Today: आठवड्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोल स्वस्त की महाग? वाचा आजचे दर

(gold rate today silver rates on 8 february in mumbai and delhi here is todays gold price)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.