AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today : बापरे ! एका आठवड्यात 6 हजारांनी महागलं सोनं, चांदीचे दरही चढेच… आज किती किंमत ?

Gold Price Today 17 May 2025 Latest Updates in Matrathi : आतंररार्षट्रीय पातळीवरील घटनांचा सोन्या-चांदीच्या दरावर चांगलचा परिणाम होतो. सातत्याने या दोन्ही धातूंच्या किंमती वरखाली होत असतात. ाज सोन्याचे दर किती आहेत ?

Gold Price Today : बापरे ! एका आठवड्यात 6 हजारांनी महागलं सोनं, चांदीचे दरही चढेच... आज किती किंमत ?
सोन्याचे- चांदीचे दर
| Updated on: May 17, 2026 | 9:01 AM
Share

भारतात सोन्याच्या दरात साप्ताहिक वाढ सुरूच आहे. एका आठवड्यात 24 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल 6 हजार 540 रुपयांची वाढ झाली आहे. एवढंच नव्हे तर 22 कॅरेट सोन्याचे दर 6 हजार 470 रुपयांनी वाढले आहेत.आज रविवार, 17 मे रोजी, देशाची राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी तब्ल 1 लाख 57 हजार, 080 रुपये इतका आहे. शुक्रवार, 15 मे रोजी दिल्ली सराफा बाजारात 99.9 टक्के शुद्ध सोन्याचा भाव 3200 रुपयांनी, म्हणजेच 1.93 टक्क्यांनी घसरून प्रति १० ग्रॅम 1,62,000 रुपयांवर आला. डॉलरच्या मजबुतीमुळे आणि गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात नफावसुली केल्यामुळे ही घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा भाव प्रति औंस 4,548.46 डॉलर्स इतका आहे.

देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर

राजधानी दिल्लीतमध्ये 10 ग्रॅमचं 24 कॅरेट सोनं हे 1,57,080 रुपयांना तर 22 कॅरेट सोनं हे 1,44,000 दराने विकलं जात आहे. तर आर्थिक राजधानी मुंबईत आणि कोलकाता येथे 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,56,930 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 1,43,850 रुपये इतकी आहे.

चेन्नईमध्ये सोन्याचे दर सर्वाधिक असून 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्यासाठी 1, 60, 910 रुपये तर 22 कॅरेटसाठी 1,47,500 रुपये मोजावे लागतील. पुणे व बंगळुरूमध्ये 24 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं 1,56,930 रुपयांना आणि 22 कॅरेट सोनं हे 1,43,850 रुपयांना विकलं जातंय.

शहर 22 कॅरेट सोन्याचा आजचा दर (₹) 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर (₹)
दिल्ली 144000 157080
मुंबई 143850 156930
अहमदाबाद 143900 156980
चेन्नई 147500 160910
कोलकाता 143850 156930
हैदराबाद 143850 156930
जयपुर 144000 157080
भोपाळ 143900 156980
लखनऊ 144000 157080
चंदीगड 144000 157080

चांदीचे दर किती ?

सोन्याप्रमाणेच चांदी या आणखी एका मौल्यवान धातूच्या किमतीतही साप्ताहिक वाढ होताना दिसली. चांदी 5000 रुपयांनी महागली आहे. 17 मे रोजी सकाळी चांदीचा भाव 2,80,00 रुपये प्रति किलोग्राम होता. शुक्रवार, १15५ मे रोजी दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीचा भाव 21,600 रुपयांनी किंवा 7.3 टक्क्यांनी घसरून 2,75,000 रुपये प्रति किलोग्राम झाला. यावर्षी जानेवारी महिन्यात देशात चांदीच्या भावाने 4 लाख रुपयांचा आकडा ओलांडला होता. मात्र त्ायनंतर चांदीचे भाव खाली घसरले. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सिल्व्हरचा भाव 78.21 डॉलर प्रति औंस इतका आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात