Gold-Silver Price Today 25 February 2026 : लग्नसराईत सोन्या-चांदीच्या दरात मोठी हालचाल ! 10 ग्रॅम सोन्याचे आजचे दर काय ?
Gold-Silver Rate Today 25 February 2026 Latest News Updates in Marathi : अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे जागतिक अनिश्चितता अधिकच गडद होऊ लागली आहे, ज्याचा थेट परिणाम मौल्यवान धातूंच्या किमतींवर होताना दिसतोय. सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असलेल्या गुंतवणूकदारांची पावलं पुन्हा सोने आणि चांदीच्या दिशेने वळत आहेत. आज सोन्याच्या आणि चांदीच्या दरात घट झाली की वाढ ?

Gold Silver Rate Today : आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत्या भू-राजकीय अनिश्चिततेमुळे मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये वाढ होत आहे. अमेरिका आणि इराणमधील वाढत्या युद्ध संकटामुळे, गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा सोने आणि चांदीकडे, सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी आज, म्हणजेच 25 फेब्रुवारी रोजी सोने आणि चांदीच्या किमतीही मजबूत झाल्या. भारतात सध्या लग्नसराईचा सुरू आहे आणि याच काळात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय चढ-उतार होत आहेत. कधी खाली तर कधी वर असे सोन्या चांदीचे दर आहेत. एमसीएक्सवर, सोन्याचा भाव सुमारे0.54% वाढून प्रति 10 ग्रॅमसाठी 1 लाख 60 हजार 833 वर पोहोचला आहे. तर चांदीचा वायदा भाव 2% पेक्षा जास्त वाढून प्रति किलोग्रॅमसाठी 2 लाख 66 हजार 189 रुपयांवर पोहोचला आहे. bullion.in नुसार, सोन्याच्या किमतीत 800 रुपयांची आणि चांदीच्या किमतीत 5800 रुपयांची वाढ झाली.
रिटेल बाजाराची परिस्थिती
bullion.in च्या आकड्यांनुसार, आज म्हणजेच 25 फेब्रुवारी रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 800 रुपयांनी वाढून 1,61,160 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर चांदीचा भाव 5800 रुपयांनी वाढून 2,67,110 रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला.

आंतराराष्ट्रीय बाजारात दर काय ?
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती किंचित घसरल्या, तर चांदी मात्र स्थिर राहिली आहे. 25 फेब्रुवारी रोजी सकाळी स्पॉट सिल्व्हर 2.99 ९% वाढून 89.4 डॉलर प्रति औंस झाला. तर दुसरीकडे, स्पॉट गोल्ड 0.40 % ने घसरले, त्यानंतर त्याची किंमत प्रति औंसंसाठी 5185 डॉलर इतकी झाली.

सध्या, जागतिक आर्थिक अनिश्चितता, मध्यवर्ती बँकेची धोरणे, भू-राजकीय तणाव आणि चलन विनिमय दर यासह अनेक घटकांमुळे सोन्याच्या किमती प्रभावित होताना दिसत आहेत. जेव्हा जेव्हा जागतिक स्तरावर अनिश्चितता वाढते तेव्हा गुंतवणूकदार हे सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून सोनं आणि चांदीकडे वळतात, परिणामी त्याच्या किमतींना आधार मिळतो. भविष्यातील दिशा निश्चित करण्यासाठी डॉलर-रुपया विनिमय दर, आंतरराष्ट्रीय किमती आणि देशांतर्गत मागणी यावर बाजाराच लक्ष राहील. जर रुपया कमकुवत होत राहिला किंवा लग्न आणि गुंतवणुकीची मागणी मजबूत राहिली तर सोन्याच्या किमती वाढू शकतात. जागतिक बाजारपेठेत पुन्हा तेजी आल्यास, देशांतर्गत किमतींमध्ये देखील आणखी वाढ होऊ शकते.
