Gold Silver price today: रुपयातील तेजीमुळे सोनं काहीसं स्वस्त, जाणून घ्या एक तोळा सोन्याचा भाव

सकाळी 10.40 वाजता MCX वर ऑगस्ट डिलिव्हरीवालं सोनं 75 रुपयांनी उतरुन 48 हजार 325 रुपयांपर्यंत खाली आलं आहे. गुरुवारी हे सोनं 48 हजार 400 रुपयांवर होतं. तर ऑक्टोबर डिलिव्हरी वालं सोनं यावेळी 72 रुपयांनी स्वस्त झालं असून 48 हजार 603 रुपये प्रति तोळ्यावर ट्रेड करत आहे.

Gold Silver price today: रुपयातील तेजीमुळे सोनं काहीसं स्वस्त, जाणून घ्या एक तोळा सोन्याचा भाव
Gold Silver Price
Follow us
| Updated on: Jul 16, 2021 | 11:41 AM

मुंबई : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी इंटरनॅशनल मार्केटमध्ये सोन्याच्या किमतीवर (Gold Price Today) दबाव आहे. ज्यामुळे डोमेस्टिक मार्केटमध्येही MCX वर सोनं लाल निशाणावर ट्रेड करत आहे. सकाळी 10.40 वाजता MCX वर ऑगस्ट डिलिव्हरीवालं सोनं 75 रुपयांनी उतरुन 48 हजार 325 रुपयांपर्यंत खाली आलं आहे. गुरुवारी हे सोनं 48 हजार 400 रुपयांवर होतं. तर ऑक्टोबर डिलिव्हरी वालं सोनं यावेळी 72 रुपयांनी स्वस्त झालं असून 48 हजार 603 रुपये प्रति तोळ्यावर ट्रेड करत आहे. (Find out today’s gold and silver prices)

यावेळी MCX वर डिलिव्हरीव्या चांदीच्या किमतीत तेजी पाहायला मिळत आहे. सप्टेंबर डिलिव्हरीवाली चांदी 150 रुपयांच्या तेजीसह 69 हजार 831 रुपये प्रति किलोवर आहे. तर डिसेंबर डिलिव्हरीवाली चांदी 214 रुपयांच्या तेजीसह 71 हजार 76 रुपये प्रतिकिलो रुपयांवर ट्रेड करत आहे. सोन्याच्या दरात सलग तीन दिवस तेजी पाहायला मिळाल्यानंतर आज इंटरनॅशनल मार्केटमध्ये सोनं 0.11 टक्क्यांनी उतरलं आहे.

मुंबई, पुण्यातील एक तोळा सोन्याचा भाव काय?

मुंबई आणि पुण्यात आज 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव हा 48 हजार 480 रुपयांवर आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 47 हजार 489 रुपये आहे. तर चांदीच्याही किंमतीत 300 रुपयांची वाढ झाली आहे. एक किलो चांदीसाठी आज 69 हजार 500 रुपये मोजावे लागणार आहेत.

आजपर्यंत गुंतवणुकीची संधी

सोन्याच्या वाढत्या किमतींच्यादरम्यान आजपर्यंत सरकारी सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी आहे. खरं तर सरकारची सार्वभौम गोल्ड बाँड योजना सबस्क्रिप्शनसाठी 16 जुलै 2021 पर्यंत खुली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या मते या सोव्हर्न गोल्ड बाँड योजना 2021-22 मालिका IV ची किंमत प्रति ग्रॅम 4,807 रुपये आहे. रिझर्व्ह बँक भारत सरकारच्या (भारत सरकार) च्या सल्ल्यानुसार ऑनलाईन अर्ज करणाऱ्या आणि डिजिटल पद्धतीने पैसे देणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपये सूट मिळेल. रिझर्व्ह बॅंकेच्या मते, अशा गुंतवणूकदारांची इश्यूची किंमत प्रति ग्रॅम सोने 4,757 रुपये असेल. भारत सरकारचं पाठबळ असलेल्या गोल्ड इन्व्हेस्टमेंट योजनेत सोन्याच्या गुंतवणूकदारांची आवड वाढवण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) गुंतवणूकदारांना या योजनेत गुंतवणुकीसाठी पुरेशी अशी सहा सुवर्ण कारणे दिलीत.

संबंधित बातम्या :

GST Compensation: केंद्राकडून राज्यांना 75,000 कोटी जाहीर, पुढचा हप्ता कधी मिळणार?

Gold Rate Today: सोने पुन्हा एकदा महागले, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याची किंमत

Find out today’s gold and silver prices

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.