Gold Rate Today: सोने पुन्हा एकदा महागले, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याची किंमत

एमसीएक्सवर दुपारी 1 वाजताच्या सुमारास ते 173 रुपयांच्या वाढीसह प्रति 10 ग्रॅम 48472 रुपयांवर व्यापार करीत होते. 

Gold Rate Today: सोने पुन्हा एकदा महागले, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याची किंमत
Gold Rate Today

नवी दिल्लीः गुरुवारीच्या व्यापार सत्रात दुपारी 1 वाजता मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या किमती 173 रुपयांनी (Gold Rate Today) वाढल्यात. सकाळच्या व्यापारात मात्र सोन्यातील घसरणीचा कल दिसून आला होता. परंतु दुपार होताच पिवळ्या धातूने वेगवान वाढ नोंदवली. एमसीएक्सवर दुपारी 1 वाजताच्या सुमारास ते 173 रुपयांच्या वाढीसह प्रति 10 ग्रॅम 48472 रुपयांवर व्यापार करीत होते.

सोन्यासह चांदीच्या भावातही तेजी

सोन्यासह चांदीच्या भावातही तेजी दिसून आली. एमसीएक्सवर सप्टेंबरच्या डिलिव्हरीचा चांदीचा भाव 383 रुपयांनी वाढून 69795 रुपये प्रतिकिलोवर होता. सकाळच्या सत्राविषयी बोलायचे झाल्यास सोन्याची किंमत 48,501 रुपयांच्या उच्च पातळीवर आणि 48,250 रुपयांच्या नीचांकी पातळीवर होती.

सराफा बाजारात किंचित वाढ

बुधवारी व्यापार सत्रात सराफा बाजारात सोन्याच्या किमतींमध्ये किंचित वाढ झाली होती. बुधवारी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 23 रुपयांनी वाढून 47,024 रुपये झाला. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली. यामुळे मागील व्यापार सत्रात सोन्याचे दर 10 ग्रॅम 47,001 रुपयांवर बंद झाले होते. सोन्याची वाढ झालेली असली तरी चांदीचे दर 399 रुपयांनी घसरून ते 67,663 रुपये प्रतिकिलोवर होते.

उद्यापर्यंत आहे गुंतवणुकीची संधी

सोन्याच्या वाढत्या किमतींच्यादरम्यान उद्यापर्यंत सरकारी सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी आहे. खरं तर सरकारची सार्वभौम गोल्ड बाँड योजना सबस्क्रिप्शनसाठी 16 जुलै 2021 पर्यंत खुली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या मते या सोव्हर्न गोल्ड बाँड योजना 2021-22 मालिका IV ची किंमत प्रति ग्रॅम 4,807 रुपये आहे. रिझर्व्ह बँक भारत सरकारच्या (भारत सरकार) च्या सल्ल्यानुसार ऑनलाईन अर्ज करणाऱ्या आणि डिजिटल पद्धतीने पैसे देणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपये सूट मिळेल. रिझर्व्ह बॅंकेच्या मते, अशा गुंतवणूकदारांची इश्यूची किंमत प्रति ग्रॅम सोने 4,757 रुपये असेल. भारत सरकारचं पाठबळ असलेल्या गोल्ड इन्व्हेस्टमेंट योजनेत सोन्याच्या गुंतवणूकदारांची आवड वाढवण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) गुंतवणूकदारांना या योजनेत गुंतवणुकीसाठी पुरेशी अशी सहा सुवर्ण कारणे दिलीत.

संबंधित बातम्या

10 ऑगस्टला देशभरात बत्ती गुल होण्याची शक्यता; सरकारचा एक निर्णय ठरू शकतो कारणीभूत

अ‍ॅक्सिस बँकेच्या FD आणि RD मध्ये गुंतवणूक करायचीय, पेनल्टीशिवाय करा हे काम

Gold Rate Today: Gold is expensive again, check the price of 10 grams of gold

Published On - 3:17 pm, Thu, 15 July 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI