Today’s gold, silver prices : सोन्याच्या दरात किंचित घसरण, जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

Today's gold, silver prices : सोन्याच्या दरात किंचित घसरण, जाणून घ्या आपल्या शहरातील भाव
आजचे सोन्या-चांदीचे भाव
Image Credit source: TV9 Marathi

सोन्याच्या (Gold) दरात आज पुन्हा एकदा घसरण पहायला मिळत आहे. गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार दहा ग्रॅम अर्थात प्रति तोळा 22 कॅरट सोन्याची किंमत आज 47 हजार 640 रुपये इतकी झाली आहे. तर बुधवारी 22 कॅरट सोन्याची किंमत 47750 इतकी होती.

अजय देशपांडे

|

Mar 31, 2022 | 1:07 PM

मुंबई : सोन्याच्या (Gold) दरात आज पुन्हा एकदा घसरण पहायला मिळत आहे. गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार दहा ग्रॅम अर्थात प्रति तोळा 22 कॅरट सोन्याची किंमत आज 47 हजार 640 रुपये इतकी झाली आहे. तर बुधवारी 22 कॅरट सोन्याची किंमत 47750 इतकी होती. याचाच अर्थ आज सोन्याच्या दरामध्ये कालच्या तुलनेत 110 रुपयांची किरकोळ घट झाली आहे. तर दुसरीकडे चांदीचे (silver) आजचा दर 67 हजार 400 रुपये प्रति किलो एवढा आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ -उतार सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा जागतिक बाजारपेठेवर परिणाम झाला असून, काही दिवसांपूर्वी सोन्याच्या किमती चांगल्याच कडाडल्या होत्या, मात्र त्यानंतर त्यामध्ये घसरण पहायला मिळाली. आज देखील सोन्याच्या किमतींमध्ये किंचितशी घसरण झाली आहे.

राज्याच्या प्रमुख शहरातील सोन्याचे दर

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47640 इतका आहे. तर 24 कॅरट सोन्याचा दर 51,970 इतका आहे. पुण्यात आज 22 कॅरट सोन्याचा भाव 47690 इतका आहे, तर 24 कॅरट सोन्याची किंमत 52020 इतकी आहे. नागपूरमध्ये 22 आणि 24 कॅरट सोन्याचा प्रति तोळा दर अनुक्रमे 47690 आणि 52020 रुपये इतका आहे. तर चांदीचा दर प्रति किलो 67 हजार 400 रुपये एवढा आहे. चांदीच्या भावात गेल्या काही दिवसांपासून वाढ होताना दिसत आहे.

सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये वाढ

रशिया आणि युक्रेन युद्धाचा मोठा परिणाम हा जागतिक बाजारपेठेवर झाला आहे. युद्धामुळे कच्च्या तेलापासून ते खाद्यतेलापर्यंत सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. सोन्यासारख्या मौल्यवान धातुच्या किमती देखील वाढल्या आहेत. दरम्यान येत्या काळात त्यामध्ये आणखी वाढ होऊ शकते असा अंदाज आहे. त्यामुळे सध्या सोन्यातील गुंतवणूक वाढताना दिसत आहे. सोन्याची मागणी वाढल्याने सोन्याच्या दरात तेजी आल्याचे पहायला मिळत आहे.

संबंधित बातम्या

नव्या आर्थिक वर्षात होणार मोठे फेरबदल; घरे, औषधांच्या दरामध्ये होणार वाढ; PF चे नियम देखील बदलणार

Petrol, Diesel Price: इंधन दरवाढ सुरूच; आज पुन्हा पेट्रोल, डिझेल 80 पैशांनी महागले; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

आधारला पॅन लिंक करण्याचा आज शेवटचा दिवस, …तर पॅन कार्ड चालूच राहणार मात्र भरावा लागणार दंड

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें