सोन्या, चांदीच्या दरात तेजी; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

सोन्या, चांदीच्या दरात तेजी; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

आज पुन्हा एकदा सोने, चांदीच्या दरामध्ये तेजी दिसून येत आहे. सोमवारी सोन्याचे दर 46,770 वर बंद झाले होते. मंगळवारी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आज सोन्याचे दर प्रतितोळा 47780 रुपयांवर पोहोचले आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Dec 14, 2021 | 2:13 PM

मुंबई : आज पुन्हा एकदा सोने, चांदीच्या दरामध्ये तेजी दिसून येत आहे. सोमवारी सोन्याचे दर 46,770 वर बंद झाले होते. मंगळवारी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. आज सोन्याचे दर प्रतितोळा 47780 रुपयांवर पोहोचले आहेत. म्हणजे सोन्याच्या दरात सरासरी हजार रुपयांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या किमतीमध्ये देखील वाढ झाली असून, चांदीचे दर प्रति तोळा 61 हजार 600 रुपयांवर पोहोचले आहेत.

प्रमुख शहरातील दर

कमोडिटी मार्केटनुसार आज मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 46780 रुपये आहेत. तर 24 कॅरेट सोन्याचे दर 47770 रुपयांवर पोहोचले आहेत. नागपूरमध्ये प्रति तोळा 22 कॅरट सोन्याचे दर  46780 रुपये आहेत तर 24 कॅरेट सोन्याचे दर 47780 रुपये इतके आहे. पुण्यात 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 46220 तर 24 कॅरेट सोन्याचे दर तब्बल 49550 रुपयांवर पोहोचले आहेत. आज पुण्यात सोने चांगलेच महाग झाल्याचे दिसून येत आहे.

सोन्यामधील गुंतवणुकीला फटका

गेल्या वर्षभरापासून सोन्याचे दर सातत्याने अस्थिर असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर सर्वोच्च स्थरावर म्हणजे प्रति तोळा 56 हजार इतके झाले होते. मात्र त्यानंतर त्यात सातत्याने घसरण होत गेली. या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात तर सोन्याचे दर 45 हजारांपर्यंत खाली आले होते. मात्र त्यानंतर पुढील दोन महिन्यांत ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये त्यात सरासरी अडीच ते तीन हजारांची वाढ होऊन ते 47 हजारांपर्यंत पोहोचले आहे. सोन्याचे भाव सातत्याने कमी जास्त होत असल्याने गुंतवणूकदार जोखमी घेण्याच्या तयारीत नसल्यामुळे सोन्यातील गुंतवणूक कमी होत आहे. गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी सोन्यापेक्षा इतर मार्गाचा शोध घेत आहेत.

संबंधित बातम्या

घाऊक महागाईच्या दरात पुन्हा वाढ; अन्नधान्य, भाजीपाला सर्वच गोष्टी महागल्या

देशातील बेरोजगारीचे प्रमाण वाढले; अर्थव्यवस्थेला कोरोनाचा फटका, ग्रामीण भागातील तरुणांचे रोजगाराच्या शोधात स्थलांतर

अन्न, निवारा महागला, वस्त्रांच्याही किंमती वाढणार; सर्वसामान्यांना दरवाढीचा मोठा फटका

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें