Gold Silver Rate : सोने-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव

Goodreturns या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी मुंबईतील 22 कॅरेट सोन्याचा भाव 46 हजार 200 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 47 हजार 200 रुपये आहे.

Gold Silver Rate : सोने-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव

मुंबई : कमॉडिटी मार्केटमध्ये सलग दुसऱ्या सत्रात सोने आणि दांचीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याच्या आजच्या भावात 200 रुपयांनी वाढ झालीय. त्यामुळे सोन्याचा आजचा भाव 47 हजार 227 रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीच्या भावातही आज 240 रुपयांनी वाढ झाली आहे. Goodreturns या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी मुंबईतील 22 कॅरेट सोन्याचा भाव 46 हजार 200 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 47 हजार 200 रुपये आहे. (Once again the price hike of gold-silver, know today’s rate)

Goodreturnsनेच दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील आजचा 22 कॅरेट सोन्याचा भाव 46 हजार 160 रुपये झालाय. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 50 हजार 160 रुपये झालाय. चेन्नईतील सोन्याचा भाव पाहिला तर 22 कॅरेट सोन्याचा दर 44 हजार 650 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 48 हजार 710 रुपये आहे. कोलकात्यात 22 कॅरेट सोन्याचा दर 46 हजार 160 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 50 हजार 160 रुपये आहे.

MCX वर दुपारी 12 वाजता ऑगस्टमध्ये डिलिव्हरीवालं सोनं 0.40 टक्के तेजीनुसार 47 हजार 227 रुपये प्रति तोळ्यावर ट्रेड करत आहे. तर ऑक्टोबर डिलिव्हरी वालं सोनं यावेळी 179 रुपयांच्या तेजीसह 47 हजार 500 रुपये स्तरावर पोहोचला आहे. तर डिसेंबर डिलिव्हरी वाला सोना 364 रुपये घसरुन 47 हजार 229 रुपये प्रति तोळा ट्रेड करत आहे.

डेल्टा व्हेरिएंटमुळे सोन्याच्या दरात तेजी, तज्ज्ञांचा अंदाज

कमोडिटी मार्केटच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटची प्रकरणं मोठ्या प्रमाणात समोर येत असल्यामुळे सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळतेय. डोमेस्टिक मार्केटमध्ये सोन्यासाठी 47 हजार 335 रुपये रेझिस्टंन्स आहे. मिंटमध्ये छापून आलेल्या बातमीनुसार Geojit Financial Services चे रिसर्च हेड हरीश व्ही. यांनी म्हटलं आहे की, इंटरनॅशनल मार्केटमध्ये सोनं 1800 ते 1748 डॉलर दरम्यान राहिल.

48 हजारापासून किमती वाढणार? 

गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते, “जुलैनंतर सोने महाग होण्याची शक्यता आहे. सध्याची सोने दरातील घसरण अस्थिर आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी घाबरण्याची गरज नाही. जर सोन्याच्या किमती घसरत असतील तर खरेदीची चांगली संधी म्हणून गुंतवणूकदारांनी त्याकडे पाहावं. महिनाभरात सोन्याचा दर तोळ्यामागे 48,500 रुपयांपर्यंत जाऊ शकतो”

आयात शुल्कात कपात

भारत सरकारने परदेशी बाजारातील घसरणीमुळे सोने-चांदीच्या आयात शुल्कात कपात केली आहे. सरकारी अधिसूचनेनुसार सोने-चांदीवर जवळपास 566 डॉलर प्रती 10 ग्रॅम (सोने) तर 836 डॉलर प्रती किलो (चांदी) आयात शुल्क आहे. 1 जुलै 2021 पासून ही अधिसूचना लागू करण्यात येत आहे.

इतर बातम्या :

Money: पोस्ट ऑफिसच्या 5 बचत योजनांमध्ये पैसे गुंतवा, कमी कालावधीमध्ये पैसे दुप्पट होणार

15 हजारापेक्षा कमी पगार असलेल्या कामगारांना सरकारचा मोठा दिलासा, ‘या’ योजनेतील रजिस्ट्रेशनची नवी तारिख काय?

Once again the price hike of gold-silver, know today’s rate

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI