AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 1 March 2025 : सोने-चांदी स्वस्ताईच स्वस्ताई, इतक्या दणकावून घसरल्या किंमती

Gold Silver Rate Today 1 March 2025 : फेब्रुवारी महिन्यात सोन्याने मोठी मुसंडी मारली. प्रत्येक आठवड्यात एक विक्रम या धातुने नोंदवला. त्यामानाने चांदीला मोठी मजल मारता आली नाही. आता महिना अखेर दोन्ही धातुत मोठी पडझड झाली. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या...

Gold Silver Rate Today 1 March 2025 : सोने-चांदी स्वस्ताईच स्वस्ताई, इतक्या दणकावून घसरल्या किंमती
सोने आणि चांदीची आनंदवार्ताImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Mar 01, 2025 | 8:40 AM
Share

सोने आणि चांदीने गेल्या महिन्यात, फेब्रुवारीत ग्राहकांचे दिवाळे काढले. सोन्याने तर फेब्रुवारीच्या प्रत्येक आठवड्यात दरवाढीचा रतीब कायम ठेवला. त्यामानाने चांदीला मोठी मजल मारता आली नाही. चांदी दहा-पंधरा दिवस मोठी हालचाल दिसली नाही. सोन्याने दर आठवड्यात त्यापूर्वीचा रेकॉर्ड मोडला. पण फेब्रुवाराच्या अखेरीस सलग तीन दिवसात सोने आणि चांदी जमिनीवर आले. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच ग्राहकांना दिलासा मिळाला. दोन्ही धातुत मोठी पडझड झाली. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या..(Gold Silver Price Today 1 March 2025 )

सोन्यात आली स्वस्ताई

फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याने सुरुवातीला चमक दाखवली. सोमवारी 100 रुपये, मंगळवारी 220 रुपयांनी सोने महागले. तर बुधवारी 270 रुपये, गुरुवारी 440 रुपये तर शुक्रवारी 540 अशी 1250 रुपयांची मोठी घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 79,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 86,990 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी 5 हजारांनी आपटली

सोमवारी चांदीत 500 रूपयांची वाढ झाली होती. 26 फेब्रुवारी रोजी 3 हजार, 28 फेब्रुवारी रोजी त्यात हजारांची अशी एकूण 4 हजारांची पडझड झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 97,000 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 85,056, 23 कॅरेट 84,715, 22 कॅरेट सोने 77,911 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 63,792 रुपये, 14 कॅरेट सोने 49758रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 93,480 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी