AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today | दहा दिवसांच्या तेजीनंतर सोने आणि चांदीत घसरण; ग्राहकांना मोठा दिलासा

Gold Silver Rate Today 12 March 2024 | सोने आणि चांदीने मार्च महिन्याच्या दहा दिवसांत तु्फान फटकेबाजी केली. प्रत्येक दिवशी नवीन उच्चांक गाठला. चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यातील दरवाढ ग्राहकांना मनस्ताप देणारी ठरली. त्यांना खरेदीसाठी जादा पैसे मोजावे लागले.

Gold Silver Rate Today | दहा दिवसांच्या तेजीनंतर सोने आणि चांदीत घसरण; ग्राहकांना मोठा दिलासा
सोने चमकले, मार्चमध्ये रेकॉर्डवर रेकॉर्ड
| Updated on: Mar 12, 2024 | 8:29 AM
Share

नवी दिल्ली | 12 March 2024 : तर मार्च महिन्यातील भयावह तेजीला अखेर पहिल्यांदा ब्रेक लागला. गेल्या 10 दिवसांपासून सोन्यापाठापाठ चांदीने पण रेकॉर्ड ब्रेक केले. किंमती एकदम भडकल्या. सोन्याने 66,000 चा टप्पा ओलांडला. तर चांदीने पण 75 हजारांचा टप्पा ओलांडला. दरवाढीने ग्राहकांच्या डोक्यावर आठ्या आल्या. अनेकांना खरेदीला गेल्यावर तडजोड करावी लागली. जादा रक्कम मोजावी लागली. सोने दहा दिवसांत 3,430 रुपयांनी वधारले. तर चांदीत 2300 रुपयांची वाढ झाली. या आठवड्यात सोने-चांदीच्या तेजीला ब्रेक लागला. आता अशा आहेत सोने आणि चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today 12 March 2024)..

  1. सोन्याची फटकेबाजी – मार्च महिन्यातील दहा दिवसांत सोन्याने जोरदार बॅटिंग केली. 1 मार्चपासून ते 10 मार्चपर्यंत 3,430 रुपयांनी सोने महागले. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या सत्रात पण सोने महागले. 7 मार्च रोजी सोने 400 रुपयांनी महागले. 8 मार्च रोजी किंमतीत 170 रुपयांची भर पडली. 9 मार्च रोजी 540 रुपयांची वाढ झाली. 10-11 मार्च रोजी किंमतीत बदल दिसला नाही .तर सोन्यात घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 60,890 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 66,410 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
  2. चांदीचा किंचित दिलासा – मार्च महिन्यात चांदी जवळपास 3 हजारांनी महागली. गेल्या आठवड्यात चांदीत 2300 रुपयांची वाढ झाली. अखेरच्या टप्प्यात 7 मार्च रोजी 500 रुपयांनी किंमती वाढल्या. 8 मार्च रोजी चांदीत इतकीच वाढ झाली. 9 मार्च रोजी 200 रुपयांची दरवाढी झाली. 11 मार्च रोजी 100 रुपयांनी किंमती कमी झाल्या. घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव आता 75,600 रुपये आहे.
  3. 14 ते 24 कॅरेटचा भाव काय – इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी महागली. 24 कॅरेट सोने 65,646 रुपये, 23 कॅरेट 65,383 रुपये, 22 कॅरेट सोने 60,132 रुपये झाले.18 कॅरेट 49,235 रुपये, 14 कॅरेट सोने 38,403 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 72,547 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
  4. घरबसल्या जाणून घ्या भाव – सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पलटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा