AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : खरेदीचा साजरा करा आनंदोत्सव, इतके स्वस्त झाले सोने-चांदी

Gold Silver Rate Today : सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पण सोन्याला मार्ग सापडलेला नाही. तर चांदीने थोडीपार आगेकूच केली आहे. सप्टेंबर महिन्यात काही दिवसांच्या दरवाढीनंतर दोन्ही धातूंमध्ये मोठी घसरण दिसून आली.

Gold Silver Rate Today : खरेदीचा साजरा करा आनंदोत्सव, इतके स्वस्त झाले सोने-चांदी
| Updated on: Sep 12, 2023 | 8:39 AM
Share

नवी दिल्ली | 12 सप्टेंबर 2023 : G20 Summit नंतर जागतिक राजकारणाचा सुकाणू बदलत आहे. नवीन समिकरणांचा भारताला फायदा होईल. या दोन दिवसांच्या जागतिक कुंभमेळ्याचा परिणाम सोने-चांदीवर पण दिसून आला. सोने-चांदी सूटणार अशा अटकळींना सध्या पूर्णविराम मिळाल्याचे समोर येत आहे. अमेरिकेसह भारताला नेतृत्वाची मोठी संधी गवसली आहे. डॉलरवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. या महिन्यात अमेरिकन केंद्रीय बँक व्याज दरवाढ करणार नसल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे सोने-चांदीला (Gold Silver Price Today 12 September 2023) सध्या नमते घ्यावे लागत आहे. भारतीय सराफा बाजारात दुसऱ्या आठवड्यात दोन्ही मौल्यवान धातूंना मोठी झेप घेता आली नाही. चांदीने थोडीफार आगेकूच केली आहे. सराफा बाजारात सोन्यात गुंतवणूकीची सुवर्णसंधी आली आहे. तर केंद्र सरकारने सॉव्हेरिन गोल्ड स्कीम, सुवर्ण रोखे योजना आणली आहे. यामध्ये ग्राहकांना सोन्यात गुंतवणूक करता येईल. आतापर्यंत सोने-चांदीत इतकी घसरण झाली आहे.

सोन्यात पुन्हा घसरण

गुडरिटर्न्सनुसार, सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पण सोन्यात घसरण झाली. अर्थात ही घसरण मोठी नाही. 11 सप्टेंबर रोजी सोने 10 रुपयांनी स्वस्त झाले. यापूर्वी 9 सप्टेंबर रोजी 150 रुपयांची घसरण झाली होती. 8 सप्टेंबर रोजी भाव किंचित वधारला होता. 7 सप्टेंबर रोजी सोने 160 रुपयांनी उतरले होते. . 5 आणि 6 सप्टेंबरला या दोन दिवसांत सोने 300 रुपयांनी स्वस्त झाले होते. सप्टेंबरच्या या 12 दिवसांमध्ये जवळपास 600 रुपयांची घसरण दिसून आली. 22 कॅरेट सोने 54990 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,990 रुपये प्रति 10 ग्रॅम असा होता.

चांदी 500 रुपयांनी वधारली

सप्टेंबर महिन्यात आतापर्यंत चांदी 4000 रुपयांनी स्वस्त झाली. ऑगस्ट महिन्यात शेवटच्या सत्रात किंमतीत वाढ झाली होती. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी चांदी 500 रुपयांनी वधारली. गेल्या आठवड्यात 9 सप्टेंबर रोजी 500 रुपयांनी भाव घसरले. 8 सप्टेंबर रोजी भावात बदल झाला नाही. 7 सप्टेंबर रोजी 700, 6 सप्टेंबर रोजी 500, 5 सप्टेंबरला 1000, 4 सप्टेंबर रोजी 700, 2 सप्टेंबर रोजी 200 आणि 1 सप्टेंबरला 500 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 74,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

24 कॅरेट सोने 59,199 रुपये, 23 कॅरेट 58,962 रुपये, 22 कॅरेट सोने 54,226 रुपये, 18 कॅरेट 44399 रुपये, 14 कॅरेट सोने 34,631 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदीचा भाव 71,343 रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.