AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 14 March 2025 : सोने-चांदीची धुळवड, महागाईचे उधळले रंग, दोनच दिवसात मोडले सर्व रेकॉर्ड

Gold Silver Rate Today 14 March 2025 : सध्या देशभरात रंगोत्सव सुरू आहे. होळीनंतर रंगपंचमीपर्यंत रंगांचा आनंद साजरा करण्यात येतो. सोने आणि चांदीने पण धुळवड साजरी केली आहे. गेल्या दोन दिवसात महागाईचे रंग उधळले आहेत. 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या...

Gold Silver Rate Today 14 March 2025 : सोने-चांदीची धुळवड, महागाईचे उधळले रंग, दोनच दिवसात मोडले सर्व रेकॉर्ड
सोने आणि चांदीची किंमतImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Mar 14, 2025 | 8:41 AM
Share

सोने आणि चांदीने गेल्या दोन दिवसांत महागाईचे रंग उधळले. महागाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. आता सोन्याची 90 हजारी झेप सुरू झाली आहे. तर चांदीने लाखांचा टप्पा ओलांडला आहे. ऐन रंगोत्सवातच दोन्ही धातुनी ग्राहकांना महागाईचा रंग दाखवला. शेअर बाजारात मोठी पडझड झाल्याने गुंतवणूकदार अगोदरच चिंतेत असताना त्याला मौल्यवान धातुत गुंतवणूक करण्यासाठी अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. दोन दिवसात दोन्ही धातुनी महागाईचे रेकॉर्ड मोडले आहेत. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या…(Gold Silver Price Today 14 March 2025 )

सोन्याची महागाईची धुळवड

या आठवड्यात सोन्याने दरवाढीचे सत्र आरंभले आहे. सोने गेल्या चार दिवसात चकाकले आहेत. सोमवारी सोने 110 रुपयांनी वधारले. तर मंगळवारी 330 रुपयांनी स्वस्त झाले. बुधवारी 490 रुपये तर गुरूवारी 600 रुपयांनी सोने महागले. दोनच दिवसात सोन्याने 1000 हून अधिकचा पल्ला गाठला. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 81,350 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 88,730 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीने ओलांडला लाखांचा टप्पा

चांदीने या आठवड्यात मोठी मुसंडी मारली. सुरुवातीच्या दोन दिवसात चांदी किलोमागे 1100 रुपयांनी स्वस्त झाली. तर बुधवारी 2 हजार आणि गुरूवारी 1 हजारांनी चांदी वधारली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,01,000 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 86,843, 23 कॅरेट 86,495 22 कॅरेट सोने 79,548 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 65,132 रुपये, 14 कॅरेट सोने 50,803 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 98,322 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.