Gold Silver Rate Today : जोरदार उसळीनंतर सोने-चांदीने घेतला ब्रेक, इतक्या घसरल्या किंमती

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने या आठवड्यात जोरदार मुसंडी मारली. सोने 1200 रुपयांच्या घरात तर चांदीने 4100 रुपयांची मुसंडी मारली. त्यामुळे ग्राहकांनी सराफा बाजाराकडे पाठ फिरवली. अचानक वाढलेल्या किंमतींनी खरेदीदारांचा दिवाळीनंतर मोठा हिरमोड झाला. या मोठ्या उडीनंतर सोने-चांदीने थोडा ब्रेक घेतला. किंमतीत घसरण झाली.

Gold Silver Rate Today : जोरदार उसळीनंतर सोने-चांदीने घेतला ब्रेक, इतक्या घसरल्या किंमती
Follow us
| Updated on: Nov 19, 2023 | 8:30 AM

नवी दिल्ली | 19 नोव्हेंबर 2023 : सराफा बाजारात सोने-चांदीने हा आठवडा गाजवला. मौल्यवान धातूंनी जोरदार मुसंडी मारली. ग्राहकांना इतका भाव वाढेल, याचा अंदाज नव्हता. पण सोन्याने या आठवड्यात 1200 रुपयांची तर चांदीने 4100 रुपयांची मोठी झेप घेतली. राज्यातील सर्वच शहरातील सराफा बाजारात दिवाळीत ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती. धनत्रयोदशी आणि दिवाळी पाडव्याला किंमतीत वाढ झाली असली तरी या मुहूर्तावर जोरदार खरेदी झाली. पण दिवाळीनंतर सोने-चांदीत (Gold Silver Price Today 19 November 2023) मोठी दरवाढ झाली. त्यामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. या लांब उडीनंतर सोने-चांदीच्या किंमतीत थोडी घसरण झाली. अशा आहेत सोने-चांदीच्या किंमती…

सोन्यात घसरण

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातील सोने-चांदीने मोठी उसळी घेतली नाही. पण महिन्याच्या मध्यावर दिवाळीत दरवाढ झाली. या आठवड्यात 13 नोव्हेंबर रोजी सोने 100 रुपयांनी घसरले. 14 नोव्हेंबर रोजी सोन्याचा भाव 110 रुपयांनी वाढला. 15 नोव्हेंबर 400 रुपयांनी भाव वाढले. 17 नोव्हेंबर रोजी सोने 600 रुपयांची उसळी घेतली. 18 नोव्हेंबर रोजी त्यात 50 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 56,700 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,790 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीचा दरवाढीला ब्रेक

या आठवड्यात चांदीने जोरदार मुसंडी मारली. 13 नोव्हेंबर रोजी किंमती 600 रुपयांनी घसरल्या. 15 नोव्हेंबर रोजी चांदीने 600 रुपयांची वाढ नोंदवली. 15 नोव्हेंबर रोजी किंमती थेट 1700 रुपयांनी वधारल्या. तर 16 नोव्हेंबर रोजी किंमतीत 300 रुपयांची वाढ झाली. 17 नोव्हेंबर रोजी चांदीच्या किंमतीत 1500 रुपयांची वाढ झाली. 18 नोव्हेंबर रोजी किंमतीत 500 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 61,170 रुपये, 23 कॅरेट 60,925 रुपये, 22 कॅरेट सोने 56,032 रुपये झाले. 18 कॅरेट 45,878 रुपये, 14 कॅरेट सोने 35,785 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 73,747 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

Non Stop LIVE Update
शिंदे गटाच्या आमदाराची वैभव नाईकांना पक्षप्रवेशाची थेट ऑफर; म्हणाले...
शिंदे गटाच्या आमदाराची वैभव नाईकांना पक्षप्रवेशाची थेट ऑफर; म्हणाले....
अरे ऐक रे.. शिंदे गट अन ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये 'कोट'वरून जुंगलबंदी
अरे ऐक रे.. शिंदे गट अन ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये 'कोट'वरून जुंगलबंदी.
जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, कुणाची जिव्हारी लागणारी टीका?
जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, कुणाची जिव्हारी लागणारी टीका?.
आगामी निवडणुकीच्या तोंडावर आमदारांना भरमसाठ निधी, एकाला किती कोटी?
आगामी निवडणुकीच्या तोंडावर आमदारांना भरमसाठ निधी, एकाला किती कोटी?.
दिशा सालियान प्रकरण नेमकं काय? आदित्य ठाकरेंशी का लावलं जातंय कनेक्शन?
दिशा सालियान प्रकरण नेमकं काय? आदित्य ठाकरेंशी का लावलं जातंय कनेक्शन?.
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी होणार SIT चौकशी?
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी होणार SIT चौकशी?.
आव्हाडांना दणका,विधानभवन परिसरातील NCP च्या कार्यालयाची नेमप्लेट हटवली
आव्हाडांना दणका,विधानभवन परिसरातील NCP च्या कार्यालयाची नेमप्लेट हटवली.
वाढलेली ढेरी, अजितदादा आणि आव्हाड यांच्यात पोटसूड, काय केली टीका?
वाढलेली ढेरी, अजितदादा आणि आव्हाड यांच्यात पोटसूड, काय केली टीका?.
गळ्यात संत्र्यांची माळ अन निषेध; बळीराजाच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक
गळ्यात संत्र्यांची माळ अन निषेध; बळीराजाच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक.
नवाब मलिक अधिवेशनात, कोणाला पाठिंबा देणार? अजित पवार की शरद पवार?
नवाब मलिक अधिवेशनात, कोणाला पाठिंबा देणार? अजित पवार की शरद पवार?.