AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 2 March 2025 : सोने -चांदी खरेदीचा प्लॅन, मग जाणून घ्या भाव

Gold Silver Rate Today 2 March 2025 : रविवारी सोने आणि चांदी खरेदीची योजना असेल तर या आठवड्यात मौल्यवान धातुनी ग्राहकांचा हिरमोड केला की त्यांना दिलासा दिला? आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या...

Gold Silver Rate Today 2 March 2025 : सोने -चांदी खरेदीचा प्लॅन, मग जाणून घ्या भाव
सोने आणि चांदीचा भाव कायImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 02, 2025 | 9:57 AM
Share

जानेवारी महिन्यापासून सोन्यात दरवाढीचे सत्र सुरू आहे. 1 फेब्रुवारी रोजी बजेट सादर झाल्यापासून सोन्याने मोठा पल्ला गाठला. चांदीत या काळात चढउताराचे सत्र दिसून आले. या आठवड्याच्या सुरुवातीला दोन दिवस सोन्यासह चांदीने पण दरवाढीचा गुलाल उधळला. पण त्यानंतर बुधवारपासून ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. तीन दिवस सतत घसरण झाली. सोने 1200 रुपयांहून अधिकने स्वस्त झाले. तर चांदीतही पडझड झाली. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या..(Gold Silver Price Today 2 March 2025 )

सोने झाले स्वस्त

या आठवड्यात सोने 1250 रुपयांनी स्वस्त झाले तर सोमवार आणि मंगळवारी मिळून 320 रुपयांनी सोने महागले. तर बुधवारी 270 रुपये, गुरुवारी 440 रुपये तर शुक्रवारी 540 घसरण झाली. शनिवारी दर स्थिर होता. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 79,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 86,990 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

आठवडाभरात चांदी 5 हजारांनी स्वस्त

या आठवड्याच्या सुरुवातीला चांदी 500 रुपयांनी महागली होती. तर 26 फेब्रुवारी रोजी 3 हजार, 28 फेब्रुवारीला 1 हजार असे एकूण 4 हजारांनी चांदीत स्वस्ताई आली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 97,000 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 85,056, 23 कॅरेट 84,715, 22 कॅरेट सोने 77,911 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 63,792 रुपये, 14 कॅरेट सोने 49758रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 93,480 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ