AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 20 December 2024 : आज किती घसरले सोने आणि चांदी? जाणून घ्या काय आहेत किंमती?

Gold Silver Rate Today 20 December 2024 : तर गेल्या आठवड्याच्या अखेरीस जसे पडझडीचे सत्र दोन्ही धातुनी आरंभले होते. तसेच सत्र या आठवड्याच्या अखेरीस दिसून येत आहे. दोन दिवसात दणादण किंमती कमी झाल्या. चांदी पण दणकावून उतरली. आता आशा आहेत किंमती...

Gold Silver Rate Today 20 December 2024 : आज किती घसरले सोने आणि चांदी? जाणून घ्या काय आहेत किंमती?
सोने आणि चांदी भाव
| Updated on: Dec 20, 2024 | 8:47 AM
Share

गेल्या आठवड्याच्या अखेरीस सोने आणि चांदीत सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी पडझड झाली होती. तसाच ट्रेंड या आठवड्याच्या अखेरीस दिसून आला. सोने आणि चांदीत स्वस्ताई आली. गेल्या आठवड्याच्या अखेरीस चांदी 4 हजारांनी तर सोने 1600 रुपयांनी उतरले. तर या आठवड्याची सुरूवातीला दोन्ही धातुना मोठा चमत्कार दाखवता आला नाही. सोमवारी किंमतीत बदल दिसला नाही. दोन दिवसात दोन्ही धातुत घसरण झाली. आता अशा आहेत बेशकिंमती धातुच्या किंमती (Gold Silver Price Today 20 December 2024 )

सोन्यात आली स्वस्ताई

गेल्या आठवड्यात सोने 1700 रुपयांनी महागले होते. तर त्यात 1600 रुपयांची घसरण दिसली होती. या मंगळवारी सोने 110 रुपयांनी वधारले तर बुधवारी त्यात 160 रुपयांची घसरण दिसली. गुरुवारी सोने 710 रुपयांनी स्वस्त झाले. आज सकाळच्या सत्रात सोन्यात घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 70,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,280 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत पुन्हा घसरण

गेल्या आठवड्यात चांदी 5,500 रुपयांनी महागली. तर 5 हजारांनी स्वस्त झाली. या आठवड्यात गुडरिटर्न्सनुसार चांदीच्या किंमतीत सुरूवातीला कोणताही बदल झालेला नाही. गुरूवारी 1000 रुपयांनी भाव उतरले. चांदी गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 91,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 76,013, 23 कॅरेट 75,709, 22 कॅरेट सोने 69,628 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 57,010 रुपये, 14 कॅरेट सोने 44,468 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 87,035 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?