AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 22 March 2025 : आनंदवार्ता, सोने-चांदी तोंडावर आपटले, किंमती झाल्या कमी, अशी आली स्वस्ताई

Gold Silver Rate Today 22 March 2025 : सोने आणि चांदी अखेर जमिनीवर आले. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या दरवाढीच्या सत्राला ब्रेक लागला. ग्राहकांना आठवड्याच्या अखेरीस दिलासा मिळाला. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या...

Gold Silver Rate Today 22 March 2025 : आनंदवार्ता, सोने-चांदी तोंडावर आपटले, किंमती झाल्या कमी, अशी आली स्वस्ताई
सोने-चांदीचा दिलासाImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Mar 22, 2025 | 8:45 AM
Share

सोने आणि चांदीने ग्राहकांना आठवड्याच्या अखेरीस मोठा दिलासा दिला. दोन्ही धातुच्या किंमतती मोठी घसरण झाली. गेल्या चार दिवसांपासून दोन्ही धातुनी रॉकेट भरारी घेतल्याने ग्राहकांच्या जीवाला मोठा घोर लागला होता. जगात शांती पर्व येत असताना या किंमती कशामुळे वाढत आहे. या दोन्ही धातुला कसलं बळ मिळत आहे, असा प्रश्न सर्वच ग्राहकांना पडला आहे. अमेरिकेच्या आक्रमक धोरणाला त्यासाठी कारणीभूत धरले जात आहे. पण आठवड्याच्या अखेरीस दोन्ही धातुनी थोडी विश्रांती घेतली. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या…(Gold Silver Price Today 22 March 2025 )

सोने 440 रुपयांनी स्वस्त

या सोमवारी सोने 110 रुपयांनी स्वस्त झाले होते. त्यानंतर थेट शुक्रवारी सोने 440 रुपयांनी घसरले. तर मंगळवारपासून ते गुरुवारपर्यंत सोन्याने हजार रुपयांची भरारी नोंदवली. मंगळवारी आणि बुधवारी प्रत्येकी 440 रुपयांनी दर वधारले. गुरूवारी 220 रुपयांनी किंमत वधारली होती. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 82,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 90,370 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी 2100 रुपयांनी दणकावून आपटली

चांदीने सोन्याशी स्पर्धा सुरू केली होती. सोमवारी चांदी 100 रुपयांनी उतरली होती. मंगळवारी 1100, बुधवारी 1000 रुपये तर गुरुवारी 100 रुपयांनी किंमत वधारली होती. तर शुक्रवारी चांदी 2100 रुपयांनी आपटली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,03,000 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 88,169, 23 कॅरेट 87,816, 22 कॅरेट सोने 80,763 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 66,127 रुपये, 14 कॅरेट सोने 51,579 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 97,620 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, तरीही आंदोलन कशासाठी? सरकारचा रोहित..
विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, तरीही आंदोलन कशासाठी? सरकारचा रोहित पवारांना थेट सवाल!
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची भेट
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची सांत्वनपर भेट; म्हणाल्या...
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक दावा; जात प्रमाणपत्राचा मुद्दा चर्चेत
तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; राणेंचा दिपकेंवर निशाणा
Nitesh Rane : तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; नितेश राणेंचा अभिजीत दिपकेंवर थेट निशाणा
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच...
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच... माजी सरपंचांचा लजिरवाणा कारभार
अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी....
Asian Games 2026 : अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी 212 रनांचं टार्गेट
छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला...
Chhatrapati sambhajinagar : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा; छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार
चुकीचा नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न; देशात-राज्यात भाजपचीच सत्ता येणार..., त्या नेत्याने सगळंच सांगून टाकलं
पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची
Vidhan Parishad Election : पुण्याच्या जागेवरून महायुतीत चुरस; विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी भाजपची उमेदवार यादी आज जाहीर होणार?; दिल्लीत बैठका सुरू