AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 23 April 2024 : सोने-चांदीच्या ‘हुनमान’ उडीला ब्रेक; काय आहेत किंमती

Gold Silver Rate Today 23 April 2024 : इराण-इस्त्राईलमध्ये युद्ध भडकण्याची शक्यता कमी झाल्याने जागतिक गुंतवणूकदारांनी इतरत्र मोर्चा वळवला आहे. त्यामुळे सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. पण याचा अर्थ सोने काही 72 हजारांच्या खाली आलेले नाही, काय आहेत किंमती?

Gold Silver Rate Today 23 April 2024 : सोने-चांदीच्या 'हुनमान' उडीला ब्रेक; काय आहेत किंमती
सोने आणि चांदीचा उतरला भाव
| Updated on: Apr 23, 2024 | 8:38 AM
Share

Iran-Israel संघर्ष उडाला असला तरी युद्ध काही भडकले नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील भीती कमी झाली आहे. त्याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेत दिसून आला. सोने आणि चांदीच्या किंमती घसरल्या. गेल्या आठवड्यात सोन्याने 2,400 डॉलर प्रति औंसपेक्षा अधिक उसळी घेतली होती. पण भारतीय बाजारात पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण दिसून आली. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. पण याचा अर्थ मौल्यवान धातूंच्या किंमती 72 हजारांच्या खाली आल्या असा नाही. काय आहेत बेशकिंमती धातूच्या किंमती?.(Gold Silver Price Today 23 April 2024)

सोन्यात घसरण

मार्च नंतर एप्रिल महिन्यात सोन्याने मोठी घौदौड केली. गेल्या आठवड्यात सोने जवळपास दोन हजारांनी महागले. तर त्यात 430 रुपयांची घसरण झाली. या आठवड्यात सोमवारी सोने 550 रुपयांनी उतरले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,700 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,840 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी सर्वात मोठा दिलासा

चांदीने गेल्या आठवड्यात 1500 रुपयांची आघाडी उघडली खरी पण त्यानंतर सोन्याप्रमाणे चांदीच्या किंमतीत कोणतीच घडामोड दिसली नाही. 17 एप्रिल रोजी चांदी 500 रुपयांनी स्वस्त झाली होती. 18, 19 आणि 20 एप्रिल रोजी चांदीने दरवाढीला ब्रेक दिला. होता. तर या आठवड्यात पहिल्याच दिवशी चांदीत 1 हजारांची पडझड झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 85,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदी स्वस्त झाली. 24 कॅरेट सोने 72,875 रुपये, 23 कॅरेट 72,583 रुपये, 22 कॅरेट सोने 66,754 रुपये झाले. 18 कॅरेट 54,656 रुपये, 14 कॅरेट सोने 42,632 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 81,554 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.