AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 29 March 2025 : चांदीची 3 हजारांची मुसंडी; सोन्याची तुफान बॅटिंग, ग्राहक रडकुंडी, काय आहेत किंमती?

Gold Silver Rate Today 29 March 2025 : गुढी पाडव्यापूर्वीच सोने आणि चांदीने मोठी मुसंडी मारली. दोन्ही धातुनी महागाईची गुढी उभारली. चांदी तीन हजारांनी तर सोने हजारांनी वधारले. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या...

Gold Silver Rate Today 29 March 2025 : चांदीची 3 हजारांची मुसंडी; सोन्याची तुफान बॅटिंग, ग्राहक रडकुंडी, काय आहेत किंमती?
सोने आणि चांदीची गरूड भरारीImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 29, 2025 | 8:32 AM
Share

गुढी पाडव्यापूर्वीच सोने आणि चांदीने महागाईची गुढी उभारली. दोन्ही धातुत दरवाढीचे तुफान आले. आठवड्याच्या सुरुवातीला दोन्ही धातुत घसरण दिसली. तर त्यानंतर सलग तीन दिवस सोन्याचा दर वाढला. चांदीने तर काल कहर केला. सोने जवळपास 1600 रुपयांनी वधारले. तर चांदीने 3 हजारांची झेप घेतली. पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याने 90 हजारांचा टप्पा ओलांडला. तर चांदी एक लाख 5 हजारांच्या पुढे पोहचली. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या…(Gold Silver Price Today 29 March 2025 )

सोने 1690 रुपयांनी महागले.

या सोमवार आणि मंगळवारी सोने 210 आणि 330 रुपये असे एकूण 540 रुपयांनी स्वस्त झाले. तर बुधवारी 110, गुरूवारी 440 आणि शुक्रवारी 1140 रुपये असे एकूम 1690 रुपयांनी महागले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 83,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 91,130 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीची गरूडझेप

या सोमवार, मंगळवारी दोन दिवस किंमती स्थिर होत्या. बुधवारी चांदी 1000 रूपयांनी वधारली. गुरुवारी दरात बदल झाला नाही. तर शुक्रवारी चांदी 3,000 रुपयांनी महागली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,05,000 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 89,164, 23 कॅरेट 88,807, 22 कॅरेट सोने 81,674 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 66,873 रुपये, 14 कॅरेट सोने 52,161 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 1,00,892 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
अजित पवारांच्या पक्षात नाराजीचं वादळ? पवार घेणार कोअर कमिटीची बैठक
अजित पवारांच्या पक्षात नाराजीचं वादळ? पवार घेणार कोअर कमिटीची बैठक.
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला....
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर....
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video.
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव....
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार.
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?.
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल.....
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल......
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ..
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ...
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार.