Gold Silver Rate Today 4 February 2025 : Budget मध्ये करात नाही कपात, सोने-चांदीचा आता काय भाव?

Gold Silver Rate Today 3 February 2025 : Budget 2025 ने नोकरदारांना लॉटरी लावली. शेअर बाजाराने नाराजी जाहीर केली. तर सोने -चांदीच्या बाजारात काय हालचाल होईल, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले होते. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या अशा आहेत किंमती?

Gold Silver Rate Today 4 February 2025 : Budget मध्ये करात नाही कपात, सोने-चांदीचा आता काय भाव?
सोने आणि चांदी किंमत
Follow us
| Updated on: Feb 04, 2025 | 8:38 AM

Budget 2025 मध्ये करदात्यांना मोठा दिलासा मिळाला. बजेटवर शेअर बाजाराने नाराजी जाहीर केली. त्यानंतर विविध क्षेत्रात बजेटवर काय प्रतिक्रिया येते, विशेषतः सोने आणि चांदीचा बाजार काय प्रतिक्रिया देतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शनिवारी अर्थसंकल्प सादर झाला. शनिवार आणि रविवार आल्याने बुलियन मार्केटच्या प्रमुख संस्थांनी किंमती जाहीर केल्या नाहीत. सोमवारी दोन्ही धातुच्या किंमती जाहीर झाल्या. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या आणि एक किलो चांदीची आता अशी आहे किंमत. (Gold Silver Price Today 4 February 2025 )

सोन्याचा दिलासा

गेल्या महिन्याने सोन्याने 6 हजारांची दरवाढ नोंदवली. गेल्या आठवड्यात 500 रुपयांनी किंमती उतरल्या तर जवळपास 2500 रुपयांनी किंमती वधारल्या होत्या. तर सोमवारी सोन्याच्या किंमतीत 440 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 77,200 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 84,200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

तीन दिवसांपासून चांदीत शांतता

गेल्या महिन्याच्या अखेरीस चांदीने 3 हजारांची भरारी घेतली. तर त्यापूर्वी चांदीला सूर गवसला नाही. 30 जानेवारी रोजी चांदी 2 हजारांनी वधारली. 31 जानेवारी रोजी त्यात हजारांची भर पडली. सोमवारी किंमती स्थिर होत्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 99,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 82,704, 23 कॅरेट 82,373, 22 कॅरेट सोने 75,757 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 62,028 रुपये, 14 कॅरेट सोने 48,382 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 93,313 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....