Gold Silver Rate Today : सोने-चांदीचा आपटी बार! किंमतीत मोठी पडझड

Gold Silver Rate Today : अखेर ग्राहकांसाठी आनंदवार्ता येऊन धडकली. सोने-चांदीने दरवाढीचा कहर चालवला होता. त्याला पहिल्यांदा मोठा ब्रेक लागला. ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. तरीही सोने-चांदीच्या किंमती चढ्याच आहेत. दोन्ही धातूत अजून घसरण होणे गरजेचे असल्याचे ग्राहकांचे मत आहे. सोने-चांदीत या दरवाढीच्या सत्रात पहिल्यांदा आपटी बार आला आहे.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीचा आपटी बार! किंमतीत मोठी पडझड
Follow us
| Updated on: Dec 06, 2023 | 8:34 AM

नवी दिल्ली | 6 डिसेंबर 2023 : सोने-चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. पहिल्यांदा किंमती दणकावून आपटल्या. मौल्यवान धातूत मोठी घसरण झाली. सराफा बाजारात या वार्ताने आनंद पसरला. ग्राहकांची गर्दी झाली. पण तरीही ग्राहकांना चढ्या दरानेच दोन्ही धातूची खरेदी करावी लागत आहे. गेल्या तीन आठवड्यात किंमतीत मोठी वाढ झाली आहे. कालच्या घसरणीने त्यात ग्राहकांना हायसे वाटले. पण वाढलेल्या किंमतीमुळे ग्राहक हैराण आहेत. सोने-चांदीत अजून घसरणीची अनेक ग्राहक वाट पाहत आहेत. सोन्याने 65,000 रुपयांचा टप्पा ओलंडल्याने ग्राहक नाराज होते. त्यात किंमतीत मोठी घसरण झाल्याने त्यांना फायदा झाला. इतके घसरले सोने-चांदीचे भाव (Gold Silver Price Today 6 December 2023)

सोन्याने ओलांडला 65 हजारांचा टप्पा

देशातील अनेक सराफा पेढ्यांवर सोन्याने 65 हजारांचा टप्पा ओलांडला. अनेक शहरातील ग्राहकांना ऐन हिवाळ्यात या किंमती पाहून घाम फुटला. सोन्याने सातत्याने नवनवीन रेकॉर्ड नावावर केले. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) यावर्षी 4 मे 2023 रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 61,646 रुपये असा सर्वोच्च भाव होता. 28 नोव्हेंबर, 1 डिसेंबर रोजी नवनवीन रेकॉर्ड झाले. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,728 रुपये झाला होता. 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 63,281 रुपयांवर पोहचली. तर चांदी 76,430 रुपये किलो झाली होती. काही शहरात तर चांदी 78,000 रुपयांच्या घरात पोहचली होती.

हे सुद्धा वाचा

सोन्यात आपटी बार

या महिन्याच्या सुरुवातीच्या तीन दिवसांत सोने 1030 रुपयांनी वधारले. या आठवड्यात 4 डिसेंबर रोजी सोन्यात 440 रुपयांची दरवाढ झाली. पण सोन्याने यूटर्न घेतला. 5 डिसेंबर रोजी सोन्यात एक हजारांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 58,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,260 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत मोठी घसरण

चांदीत या डिसेंबर महिन्याच्या चार दिवसांत 1300 रुपयांची वाढ झाली. गेल्या आठवड्यात 2300 रुपयांनी चांदी चमकली होती. 5 डिसेंबर रोजी चांदीमध्ये 2 हजारांची घसरण झाली.  गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 78,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 62,287 रुपये, 23 कॅरेट 62,038 रुपये, 22 कॅरेट सोने 57,055 रुपये झाले. 18 कॅरेट 46,715 रुपये, 14 कॅरेट सोने 36,438 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 74,383 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

Non Stop LIVE Update
हंडाभर पाण्यासाठी जीवाच रान, विहिरीतून पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी चढाओढ
हंडाभर पाण्यासाठी जीवाच रान, विहिरीतून पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी चढाओढ.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, सुपारी मिळाली की... कुणाची टीका?
अंजली दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, सुपारी मिळाली की... कुणाची टीका?.
राहुलबाबा को ये क्या हुआ...भाषण सुरू अन् स्वतःच्या डोक्यावरच ओतलं पाणी
राहुलबाबा को ये क्या हुआ...भाषण सुरू अन् स्वतःच्या डोक्यावरच ओतलं पाणी.
पैसे घ्या, पण... ; बिल्डरपुत्रानं पोर्शे कार अपघातानंतर काय म्हटलं
पैसे घ्या, पण... ; बिल्डरपुत्रानं पोर्शे कार अपघातानंतर काय म्हटलं.
BIG Breaking : आता सातबाऱ्यावर आईचंही नाव लागणार, कुणासाठी होणार नियम
BIG Breaking : आता सातबाऱ्यावर आईचंही नाव लागणार, कुणासाठी होणार नियम.
पॅन-आधार लिंक केलंय? नसेल केलं तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची
पॅन-आधार लिंक केलंय? नसेल केलं तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची.
पुणे अपघात अन् आरोप थेट अजितदादांपर्यंत, नार्को टेस्टची होतेय मागणी
पुणे अपघात अन् आरोप थेट अजितदादांपर्यंत, नार्को टेस्टची होतेय मागणी.
लोकसभेत पाठिंबा पण त्याबदल्यात आता मदत नाही? या निवडणुकीत मनसे vs भाजप
लोकसभेत पाठिंबा पण त्याबदल्यात आता मदत नाही? या निवडणुकीत मनसे vs भाजप.
राज्यात 40 पार कोण? महायुती की मविआ? काय म्हणताय राजकीय विश्लेषक?
राज्यात 40 पार कोण? महायुती की मविआ? काय म्हणताय राजकीय विश्लेषक?.
बिल्डरपुत्रान दोन जीव चिरडले अन व्यवस्थेन नियम तुडवले, धंगेकरांचा सवाल
बिल्डरपुत्रान दोन जीव चिरडले अन व्यवस्थेन नियम तुडवले, धंगेकरांचा सवाल.