बापरे! सोन्याच्या टॉयलेटचा लिलाव, खरेदीसाठी गर्दीच गर्दी; किंमत वाचून थक्कच व्हाल
Gold Toilet Auction: तुम्ही कधी टॉयलेट सीटच्या लिलावाबद्दल ऐकले आहे का? लंडनमध्ये बनवलेल्या एका मौल्यवान सोन्याच्या टॉयलेट सीटचा लिलाव होणार आहे. प्रसिद्ध इटालियन कलाकार मॉरिजिओ कॅटेलन यांनी ही सीट तयार केलेली आहे.

तुम्ही जगातील अनोख्या आणि प्राचीन वस्तूंच्या लिलावाबद्दल माहिती ऐकली असेल. अशा वस्तूंवर कोट्यवधींची बोली लावली जाते. मात्र आज आपण अशा एका वस्तूच्या लिलावाची माहिती जाणून घेणार आहोत. तुम्ही कधी टॉयलेट सीटच्या लिलावाबद्दल ऐकले आहे का? लंडनमध्ये बनवलेल्या एका मौल्यवान सोन्याच्या टॉयलेट सीटचा लिलाव होणार आहे. प्रसिद्ध इटालियन कलाकार मॉरिजिओ कॅटेलन यांनी ही सीट तयार केलेली आहे. या टॉयलेट सीटला “अमेरिका” असे नाव देण्यात आले आहे. आता या टॉयलेटच्या लिलावाची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
बोली 83 कोटींपासून सुरु होणार
समोर आलेल्या माहितीनुसार, न्यू यॉर्कमधील सोथेबीज या ठिकाणी या सोन्याच्या टॉयलेटचा लिलाव होणार आहे. या टॉयलेटच्यी सीटसाठी बोली $10 दशलक्ष म्हणजे अंदाजे 83 कोटी रूपयांपासून सुरू होणार आहे. मॉरिजिओ कॅटेलन यांची याबाबत सांगितले की, हे टॉयलेट असा संदेश देते की, श्रीमंत असो वा श्रीमंत, सोन्याचे असो वा मातीचे, दिखाऊपणाचा काहीही फायदा नाही. टॉयलेट सीटचा उद्देश एकच आहे. ही एक कलाकृती आहे जी समाजातील श्रीमंत आणि गरीब यांच्यातील फरक समोर आणते.
101 किलो सोन्याचा वापर
जगातील हे अनोखे टॉयलेट बनवण्यासाठी सुमारे 101 किलो सोन्याचा वापर करण्यात आला आहे. हे टॉयलेट केवळ प्रदुर्शनासाठी नसून तो वापरताही येते. 2019 मध्ये ब्लेनहाइम पॅलेसमध्ये अशाच प्रकारचे एक शौचालय ठेवण्यात आले होते, मात्र ते चोरीला गेले होते. तत्पूर्वी 2016 मध्ये हे टॉयलेट गुगेनहाइम संग्रहालयात वापरासाठी ठेवण्यात आले होते. 1 लाखापेक्षा जास्त लोकांनी त्याचा वापर केला होता. डोनाल्ड ट्रम्प यांना व्हाईट हाऊसमध्ये असे टॉयलेट बसवण्याची ऑफर देण्यात आली होती, मात्र ही ऑफर ट्रम्प यांना नाकारली होती.
दरम्यान, या टॉयलेटचे निर्माते मॉरिजिओ कॅटन हे अनेक वेळा वादात सापडले आहेत. कॅटन यांना एकदा भिंतीवर चिकटटेपच्या मदतीने एक केळी चिकटवली होती आणि ती कमेडियन म्हणून विकले होते. आणखी एका कलाकृतीत त्यांनी हिटलरला गुडघ्यावर बसलेले दाखवले होते, ही कलाकृती 17.2 दशलक्ष डॉलर्सना विकले गेले होते. त्यानंतर आता या टॉयलेट सीटचा लिलाव होणार आहे.
