Gold Silver Price Today : पाडव्याच्या तोंडावर आनंदवार्ता! सोन्याचा यु-टर्न, भाव झाले इतके स्वस्त, खरेदीला चलाच

Gold Silver Price Today : गेल्या आठवडाभरानंतर सोन्याने सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. गेल्या गुरुवारी सोन्याने थोडा दम खाला होता. आज सोन्याने खरेदीदारांसाठी सुवार्ता आणली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याने रेकॉर्डवर रेकॉर्ड केले. पण आज सोन्याने यु-टर्न घेतला.

Gold Silver Price Today : पाडव्याच्या तोंडावर आनंदवार्ता! सोन्याचा यु-टर्न, भाव झाले इतके स्वस्त, खरेदीला चलाच
खुशखबर
Follow us
| Updated on: Mar 21, 2023 | 9:14 AM

नवी दिल्ली : हुश्श! सोन्याने यु-टर्न घेतल्याने सर्वसामान्य खरेदीदारांना गुढी पाडव्याच्या तोंडावर मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या गुरुवारी सोने-चांदीने रिव्हर्स गिअर टाकला होता. आज पुन्हा सोने-चांदीच्या किंमतींनी गिरकी घेतली आहे. त्यामुळे आज खरेदीचा आनंद लुटता येईल. आज सोन्याने खरेदीदारांसाठी (Gold Investors) सुवार्ता आणली आहे. गेल्या आठवड्यात सोन्याने रेकॉर्डवर रेकॉर्ड केले. पण आज सोन्याने यु-टर्न घेतला. गेल्या महिन्यात 2 फेब्रुवारी रोजी सोन्याचा भाव 58,880 रुपये प्रति तोळा होता. हा रेकॉर्ड शनिवार-रविवारी मोडला. रविवारी 24 कॅरेट सोने 60,470 रुपये तोळा झाले होते. हा नवीन रेकॉर्ड झाला होता. पण आज सोने आणि चांदी स्वस्त (Gold Silver Price Today) झाले.

सोन्याच्या भावाने गेल्या आठवड्यात झपाझप वाढल्या. 13 मार्च रोजी सोमवारी सोने प्रति तोळा 56968 रुपये झाले. त्यानंतर गेल्या मंगळवारी सोने झरझर चढले. हा भाव 58,130 रुपये तोळा झाला. 15 मार्च रोजी हा भाव 58,140 रुपयांवर पोहचला. गेल्या गुरुवारी सोन्याने भाव वाढीत ब्रेक घेतला सोन्याने रिव्हअर्स गिअर टाकला. शुक्रवारी, 17 मार्च रोजी सोने 500 रुपये तोळा महागले. शनिवारी पुन्हा वाढ नोंदवली. 19 मार्च रोजी 24 कॅरेट सोने 60,470 रुपये तोळा झाले. सोमवारी सोन्यात घसरण झाली. 21 मार्च रोजी सोन्यात 540 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे गुंतवणूकदारांना हायसे वाटले.

22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या भावात प्रति तोळा मोठी घसरण झाली. 22 कॅरेट सोन्यात प्रति तोळा 500 रुपयांची घसरण झाली. आज हा भाव 54,950 रुपये आहे. तर रेकॉर्डस्तरावरुन घसरत 24 कॅरेट एक तोळा सोने अवघ्या 59,930 रुपयांना खरेदीची संधी आहे. चांदी किलोमागे 100 रुपयांनी घसरली आहे. चांदीचा भाव 72,000 हजार रुपये किलो आहे. गुडरिटर्न्सने हे ताजा भाव जाहीर केले आहेत.

हे सुद्धा वाचा

भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.

काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.